कोवळे पिंपळपान हृदयातील ब्लॉकेजेसाठी वरदान

कोवळे पिंपळपान हृदयातील ब्लॉकेजेसाठी वरदान

शलाका धर्माधिकारी : पुणे – आजकाल तरुणांमध्येही हृदयरोगाच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. ताणतणाव व बदललेली जीवनशैली यास प्रामुख्याने कारणीभूत आहे. पूर्वी वयाच्या पन्नाशीनंतर हृदयविकाराच्या कुरबुरी सुरु व्हायच्या. मात्र आता किशोरवयातच अनेक लोक हृदयविकाराने त्रस्त आहेत. २५-३० वयातटच हृदयरोगाने मृत्यू झाल्याच्या घटना आपल्या आजूबाजूला घडताना दिसतात.

हृदयविकार हा सामान्यमाणसाला न परवडणारा हा आजार आहे. खर्चिक औषधें आणि महागडी बायपास शस्त्रक्रियाचा खर्च सर्वसामन्य माणसाच्या आवाक्याबाहेरचा आहे. मात्र हृदयविकाराला दूर ठेवण्यासाठी अनेक आयुर्वेदिक उपाय आहे. निसर्गात काही अशा वनस्पती दडलेल्या आहेत. ज्या मानवी आरोग्यासाठी वरदान ठरत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे पिंपळपान. पिंपळपानापासून बनवलेले औषध हृदयासाठी अमृत ठरत आहे. जाणून घेऊयात पिंपळापासून हृदयविकारासाठी काढा कसा बनवायचा.

असा बनवावा काढा

१ महिन्याचे औषध बनवण्याच्या अंदाजाने १५ पाने तोडावीत. पिंपळाची कोवळी पाने, जी अगदीच लहान (लाल ) नाहीत. आणि अगदीच ताठरलेली नाहीत अशी निवडून घ्या. ही पाने स्वच्छ धुवून तिचे देठ आणि पुढचे टोक कट करावेत. त्यानंतर ही पाण्यात उकळायची आहेत. त्यासाठी ४ कप पाणी घ्या. त्यात ही पाने तोपर्यंत उकळा जोपर्यंत ते ४ कप पाणी १ कप आटेपर्यंत उकळावं. हा काढा थंड झाल्यानंतर गाळून घ्यावा. आणि काचेच्या बरणीमध्ये ठेवा.

कोवळे पिंपळपान हृदयातील ब्लॉकेजेसाठी वरदान

काढा घेण्याची पद्धती –

पिंपळकाढ्याचे तीन डोस सकाळी ८ वाजता , ११ वाजता आणि दुपारी २ वाजता म्हणजे दर तीन तासांनी घ्यावेत. महत्वाचे म्हणजे डोस घेण्यापूर्वी पोट रिकामे असता कामा नये. हलका, पाचक नाश्ता किंवा आहार केल्यानंतरच काढ्याचे डोस घ्यावा. हा काढा हृदयरोग झालेल्या रुग्णांनी किंवा अगदी वयाच्या पस्तिशीनंतर घेण्यास सुरुवात करावा. मात्र हा काढा सुरु करण्यापूर्वी फॅमिली डॉक्टरचा सल्लाही अवश्य घ्या. हा काढा आयुर्वेदिक असल्याने कोणतेही साईडइफेक्ट नाहीत. आणि खर्चही नाही. त्यामुळे हृदयाच्या आकाराचे हे कोवळे पिंपळपान हृदयासाठी वरदानच आहे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु