नीळा कापड आणि व्हिनेगर करेल जीवघेण्या आजारापासून बचाव, ‘या’ आहेत 4 पध्दती

नीळा कापड आणि व्हिनेगर करेल जीवघेण्या आजारापासून बचाव, ‘या’ आहेत 4 पध्दती

आरोग्यानामा ऑनलाईन टीम – कँसरसारख्या जीवघेण्या आजारापासून बचाव करण्यासाठी योग्य ती काळजी नियमित घेतली पाहिजे. हा आजार कोणालाही होऊ शकतो. निरोगी जीवनशैली अंगिकारल्यास कँसरचा धोका कमी होऊ शकतो. यासाठी जीवनशैलीत कोणते बदल केले पाहिजेत, याविषयी जाणून घेवूयात.

असे कपडे घाला

आपण परिधान केलेले कपडे स्किन कँसरपासून बचाव करतात. निळे आणि लाल कपडे, सफेद आणि पिवळ्या कपड्यांच्या तुलनेत सूर्याच्या युव्ही किरणांपासून बचाव करतात. स्किन कँसरचा धोका कमी होतो.

Image result for मांस असे शिजवा

मांस असे शिजवा

मांस जास्त आचेवर गरम केल्यास यामधील अमिनो अ‍ॅसिडचे रुपांतर टॉक्सिन्समध्ये होते. मांस तीव्र आचेवर शिजवले जाते, तेव्हा कँसरकारक तत्त्व निर्माण होतात. यासाठी मांस शिजवण्यापुर्वी त्यावर व्हिनेगर वापरावे.

धुम्रपान
धुम्रपान सोडल्याने फुफ्फूस, घसा, तोंड, ब्लॉडर आणि ग्रीवा कँसरचा धोका कमी होतो. निकोटीनमध्ये ४,००० पेक्षा जास्त केमिकल्स असतात आणि ४३ वेगवेगळे कँसरजनक पदार्थ असतात.

Related image

कॉफी नियमित घ्या

एका दिवसात सुमारे ४ कप कॉफी प्यायल्याने ओरल कँसरचा धोका ३९ टक्के कमी होतो. कमीत कमी ५ कप कॉफी काही प्रकारच्या ब्रेन कँसरची शक्यता ४० टक्के कमी करते. एका दिवसात कमीत कमी ३ कप कॉफी ब्रेस्ट कँसरची शक्यता कमी करते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु