‘काळे सोयाबीन’ वाढते वजन नियंत्रणात आणण्यासाठी उपयुक्त, करा ‘हे’ उपाय

‘काळे सोयाबीन’ वाढते वजन नियंत्रणात आणण्यासाठी उपयुक्त, करा ‘हे’ उपाय

आरोग्यनामा ऑनलाईन टीम –  वजन वाढणे ही सध्या मोठी समस्या झाली आहे. विशेष म्हणजे ही समस्या सर्वच वयोगटात दिसून येते. वजन वाढले की विविध आजारही होत असल्याने वजन नियंत्रणात ठेवणे अतिशय गरजेचे असते. घरात उपलब्ध काही पदार्थ नियमित आहारात घेतल्यास वजन नियंत्रणात राहू शकते. यापैकीच एक म्हणजे काळे सोयाबीन होय. काळे सोयाबीन नियमीत सेवन केल्यास वजन नियंत्रणात राहते. शिवाय, इतरही फायदे होतात. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणते पदार्थ उपयोगी आहेत, ते जाणून घेवूयात.

काळे सोयाबीन
Related image

काळे सोयाबीन खाल्याने चरबी वेगाने कमी करता येऊ शकते आणि वजनावरही नियंत्रण मिळवता येते. तसेच काळ्या सोयाबीनच्या सेवनाने स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता सुद्धा कमी होते.

तिखट
Related image

तिखटातील कॅस्पिनॉइडमुळे चरबी कमी होते. दररोज तिखट योग्यप्रमाणात खाल्ल्यास वजन वेगाने कमी होते.

बटाटे
Image result for बटाटे

बटाट्याने वजन वाढते असे म्हणतात, पण ते चुकीचे आहे. योग्यपद्धतीने बटाटे खाल्ले तर त्याच फायदाच होतो. भाजलेल्या किंवा उकडलेल्या बटाट्यावर काळी मिरी आणि मीठ टाकून खावे. रक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी हे उपयुक्त आहे. बटाटे उकडून दह्यासोबत खावेत.

पनीर
Image result for पनीर

व्हे-प्रोटीनपासून बनलेल्या कॉटेज पनीरमुळे स्नायू मजबूत होतात. याच्या सेवनाने वजन नियंत्रणात राहते.

अक्रोड
‘काळे सोयाबीन’ वाढते वजन नियंत्रणात आणण्यासाठी उपयुक्त, करा ‘हे’ उपाय

अक्रोडमधील प्रोटीन सडपातळ होण्यासाठी चांगले असते. हे टरफलासोबतच खावे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु