कोणत्याही गोष्टीच टेंन्शन घेण्याअगोदर स्वतःचा विचार करा

कोणत्याही गोष्टीच टेंन्शन घेण्याअगोदर स्वतःचा विचार करा

पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन – २१ व्या शतकातला सर्वांत मोठा आजार म्हणजे मानसिक आजार आहे.सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अनेक लोकांना मानसिक आजाराने ग्रासलं आहे. कारण जीवन हे अतिशय धावपळीच झालं आहे. त्यात जर जोडीदाराला आपण वेळ देऊ शकलो नाही. किंवा त्याने आपल्याला वेळ दिला नाही तर होणाऱ्या चिडचिडीतून मानसिक आजार निर्माण होतात. किंवा लोकांना सध्या अनेक गोष्टीच टेंन्शन असत. त्यामुळे मानसिक आजार होतात. पण जर तूम्हाला मानसिक आजाराला सामोरं जायचं नसेल तर कोणत्याही गोष्टीच टेंन्शन घेण्यापूर्वी स्वतःचा विचार करणे गरजेचे आहे. जेणेकरून आपण मानसिक रोगाचे बळी होणार नाहीत.

मानसिक आजार का होतात 

१) करिअर, पैसा, घर या गोष्टीची सतत चिंता असणाऱ्यांना हा आजार होतो.

२) शिक्षणात किंवा धंद्यात अनेकवेळा अपयश आल्यामुळे मानसिक रोगाला सामोरे जावे लागते.

३) व्यवस्थित झोप न झाल्यामुळे चिडचिड होते. आणि मानसिक आजाराला सामोरे जावे लागते.

४) सतत एकटे राहिल्यानेही मानसिक आजार होतात.

मानसिक आजार होऊ नये म्हणून 

१) मानसिक आजार होऊ नये म्हणून सतत खुश राहायला हव.

२) कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करू नका. असे केल्यास तुम्हाला मानसिक आजाराला सामोरे जावे लागणार नाही.

३) कोणत्याही गोष्टीचा सकारात्मक विचार केला तर तुम्हाला कधीच मानसिक आजाराला सामोरं जावं लागणार नाही.

४) कधीही एकटे राहू नका. मित्रमैत्रिणींमध्ये मिसळा त्यामुळे तुमच्या डोक्यात कोणतेही नकारात्मक विचार येणार नाहीत.

५) स्वतःला सतत कामात व्यस्त ठेवा.

६) पुरेशी झोप घ्या.

७) दररोज अशा गोष्टी करा ज्यामुळं तुमचं मन रमेल.

८) पौष्टिक व संतुलित आहार घ्या.

९) मद्याचं सेवन कमी करा.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु