आठवड्यातून एकवेळ तरी अवश्य खा ‘घोसाळी’, होतील ‘हे’ १० फायदे

आठवड्यातून एकवेळ तरी अवश्य खा ‘घोसाळी’, होतील ‘हे’ १० फायदे

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – घोसाळी सहजपणे पचणारी एक फळभाजी आहे. घोसाळीची भाजी करण्यासाठी वेळसुद्धा खूप कमी लागतो. घोसाळी ब्लड प्युरिफायर आहेत. हे शरीरातील विषारी घटक बाहेर काढतात आणि यामुळे त्वचा तजेलदार दिसते. यातील आयर्न, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन्स अ‍ॅनिमिया, ब्लडप्रेशर आणि ब्रेन फंक्शन व्यवस्थित ठेवण्यास मदत करतात. घोसाळी खाण्याचे खास १० फायदे जाणून घेवूयात.

हे आहेत १० फायदे

यात इन्सुलिन असल्याने ते डायबिटीज कमी करण्यासाठी उपयोगी ठरते.

यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते.

यामध्ये कार्बोहायड्रेट असतात. ज्यामुळे भूक लवकर लागत नाही, परिणामी वजन कमी होते.

यातील व्हिटॅमिन ए मुळे डोळ्यांची शक्ती वाढते.

यातील व्हिटॅमिन सी मुळे शरीराची इम्युनिटी वाढते.

यातील आयर्नमुळे अ‍ॅनिमिया होत नाही.

यातील व्हिटॅमिन बी ६ मुळे मेंदूचे कार्य चांगले होते.

यातील फायबरमुळे बद्धकोष्ठता, अपचन असे त्रास दूर होतात.

यामध्ये अ‍ॅन्टी इम्पलीमेंटरी गुण असतात. ज्यामुळे मसल्स मजबूत होतात. तसेच अर्थरायटीसमध्ये गुणकारी आहे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु