सौंदर्य वृद्धीसाठी प्राचीन काळापासून केले जाता ‘हे’ आयुर्वेदिक उपाय 

सौंदर्य वृद्धीसाठी प्राचीन काळापासून केले जाता ‘हे’ आयुर्वेदिक उपाय 

आरोग्यनामा ऑनलाइन टीम : आयुर्वेदात असे काही उपाय आहेत ज्यांचा वापर प्राचीन काळापासून सौंदर्य वाढवण्यासाठी केला जात आहे. गरीब कुटुंबातील स्त्रियांबरोबरच राण्याही या उपायांचा उपयोग सौंदर्यवृद्धीसाठी करत असत. आयुर्वेदात सांगितलेले हे उपाय कोणते याविषयी माहिती करून घेऊयात.

आयुर्वेदानुसार केसगळती, कोंडा अशा केसांच्या कोणत्याही समस्या आवळा लावल्याने दूर होतात. यामुळे केस सशक्त राहतात. तसेच तुळस त्वचेवर लावल्याने पिंपल्स ठीक होतात. त्वचेवर असणारे अतिरिक्त तेलही निघून जाते. त्वचेची चमक वाढवण्यासाठी प्राचीन काळापासून हळदीचा वापर केला जातो. यामुळे रंग गोरा होतोत. उन्हामुळे आलेला काळसरपणाही दूर होतो. अ‍ॅलोवेराचा उपयोग पिंपल्स, पुरळ, त्वचारोग दूर करण्यासाठी आयुर्वेदात केला जातो. आयुर्वेदानुसार कच्चे दूध चेहऱ्यासोबतच केसांना सशक्त ठेवते. यामुळे सावळेपणा दूर होतो.

लिंबूमुळे रंग गोरा होतो. त्वचा आणि केसांची चमक वाढते. काकडीमुळे त्वचेचा ओलावा टिकून राहतो. सुरकुत्या दूर होतात. वाढत्या वयाचा प्रभाव चेहऱ्यावर दिसत नाही. दह्यामुळे केसांची चमक वाढते. त्वचेचा रंग उजळवण्यासाठी दह्याचा वापर होतो. बदामाचा आयुर्वेदात गोरेपणासाठी वापर केला जातो. यामुळे चेहऱ्याचे डाग दूर होतात. केशरमुळे त्वचेच्या मृत पेशी निघून जातात. चेहऱ्याची चमकही वाढते. हे पदार्थ प्राचीन काळापासून सौंदर्य वाढविण्यासाठी वापरले जात आहेत.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु