केसाच्या समस्यांवर आयुर्वेदातात आहेत अनेक उपचार

केसाच्या समस्यांवर आयुर्वेदातात आहेत अनेक उपचार

आरोग्यानामा ऑनलाइन टीम : केसांची काळजी महिला आवर्जून घेतात. पुरूषही आपल्या केसांची निगा राखण्यात मागे नाहीत. मात्र कधी-कधी केस गळणे, कोंडा होणे यासह अन्य केसांचे विकार सुरू झाल्यास काय करावे हे सूचत नाही. अशा वेळी योग्य औषधोपचार मिळाला नाही तर केसांची हानी होते. काही औषधांमध्ये रासायनिक घटक असल्याने केसांचे नुकसान होते. यामुळे आयुर्वेदात सांगितलेले उपचार केल्यास केसविकार टाळता येऊ शकतात.प्राचीन काळापासून ऋषी-मुनींनी केसांची काळजी घेण्यासाठी शास्त्रोक्त उपाय सांगितले आहेत. तसेच अन्य शास्त्रात दिवसेंदिवस होणाऱ्या प्रगतीमुळे केसांची निगा राखण्यासाठी नवनवीन औषधे, साधने उपलब्ध होत आहेत. केशविकारांच्या निराकरणासाठी आयुर्वेदातील उपचारांना हायटेक स्वरूप देण्याचा प्रयत्न होतो आहे. या उपचार पद्धतीत केवळ केश तेल, हेअरपॅक किंवा शिरोधारा यांचाच वापर केला जात नाही, तर रुग्णांची माहिती, त्याच्या इतर आजारांची, शरीरप्रकृतीची माहिती तपासली जाते.

धातुदोषाची अवस्था तपासली जाते. केसांच्या व त्वचेच्या विकारांचे निदान व उपचार आधुनिक यंत्रे व माहितीच्या आधारे केले जाते. केसाच्या व डोक्यावरील त्वचेच्या विकारांची विविध कारणे असून बहुतांश रूग्णांमध्ये आढळणारी कारणे आपण जाणून घेऊयात. अन्नाशी संबधित कारणात पाणीपुरी खाणे हे महत्त्वाचे कारण आहे. त्याच बरोबर समोसा, कचोरी, चिप्स, लोणची, पापड व शेंगदाण्याची चटणी, क्षारयुक्त पाणी पिणे, अतिप्रमाणात मांसाहार करणे, चहा, मद्य, तंबाखू, गुटखा खाणे, जेवणाच्या अनियमित वेळा असंतुलित आहार या करणांमुळे केसविकार होतात. या सर्व पदार्थांमध्ये लवण, कटू व आम्ल रस जास्त असल्याने केसविकार होतात. दैनंदिन सवयीशी निगडित कारणे म्हणजे क्षारयुक्त पाण्याने डोके धुणे, डोक्याला लावली जाणारी तेले व शांपू सतत बदलणे, जोराचा वारा, हेअर कलर, डाय, हेअर सेटिंग, स्टायलिंगकरिता वापरली जाणारी केमिकल्स व यंत्रे, जागरण यामुळे केसविकार होतात.

तसेच हॉस्टेलमध्ये राहणारी मुले-मुली यांना तसेच गरोदर अवस्थेत अथवा प्रसुतीनंतर ६ महिने महिलांना केसविकारांचा सामना करावा लागतो. ८० टक्के लोकांमध्ये केसविकाराचे कारण मानसिक असते. मानसिक ताण-तणाव आणि मानसिक आजारांमुळे केसांवर परिणाम होतो. विविध आजारांमुळेही केसांवर परिणाम होतो. हे प्रमाण ४० टक्के आहे. कोंडा होणे, अँनिमिया, पचनाचे विकार, दीर्घकाळाचा आजार, कुपोषण, कर्करोग, मासिक पाळीच्या तक्रारी, अशा विविध कारणांमुळे केशविकार होेत असतात. केसविकारांची अशी विविध कारणे असल्याने हेअरपॅक, भृंगराज, ब्राम्ही तेल वापरून काही उपयोग नसतो. आजार, सवयी, केशविकारांची तीव्रता व स्वरूप यानुसार उपचार करून केसांची काळजी घेतली पाहिजे. केसांची काळजी नियमित घेतली पाहिजे. केसांची व डोक्याच्या त्वचेची योग्य सफाई करावी. केसांच्या मुळांचे उपचार, तेथील रक्तपुरवठा वाढवणे. त्याचबरोबर योग्य तेल, टोनर, पॅक वापरले पाहिजेत. यामध्ये अंतर्गत औषध व उपचार खूप महत्वाचे आहेत.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु