दात मजबुत आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी ‘या’ ८ पदार्थांचं सेवन नक्‍की टाळा

दात मजबुत आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी ‘या’ ८ पदार्थांचं सेवन नक्‍की टाळा

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – दात नेहमी सुंदर आणि मजबूत ठेवण्यासाठी काळजी घेतली पाहिजे. दात खराब असतील तर खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते. काही पदार्थांमुळे दातांचे नुकसान होऊ शकते. नकळतपणे असे पदार्थ खाल्ल्यास त्याचा दातांवर दुष्परिणाम होतो. काही पदार्थांच्या सेवनाने दातांवर डाग पडतात. असे पदार्थ खाल्ल्यानंतर पाण्याने चांगल्याप्रकारे चूळ भरावी. यामुळे दातांची मुळे कमकुवत होणार नाहीत. चूळ भरल्याने अ‍ॅसिडसदृश्य पदार्थ निघून जातात.

या पदार्थांपासून दूर रहा

१) पॉपकॉर्नमध्ये विविध प्रकारचे पोषक तत्वे असली तरी दातांसाठी हे हानिकारक आहे. पॉपकॉर्न दातांमध्ये अडकते. त्यामुळे दातांचे नुकसान होते. पॉपकॉर्न खाल्यानंतर दात ब्रश करावेत.

२) सफरचंदमध्ये अ‍ॅसिडचे प्रमाण अधिक असल्याने दररोज एक सफरचंद खाल्ल्यास डॉक्टरकडे जाण्याची गरज नसते. मात्र, सफरचंद अ‍ॅसिडीक असल्याने दररोज सफरचंद खाल्ल्यानंतर ब्रश जरूर करा.

३) डार्क सोड्यात कृत्रिम रंग असल्याने तो दातांसाठी हानिकारक असतो. या कृत्रिम रंगामुळे दातांवर डाग पडतात. हा सोडा प्यायल्यानंतर शरीराचे तापमान वाढते, हे दातांसाठी हानिकारक असून त्यामुळे दातांवर डाग सुद्धा पडतात.

४) सॅलड आरोग्यासाठी खूप लाभदायक असले तरी सॅलडमध्ये व्हिनेगर आणि साखरचे फ्लेवर मिसळले जात असल्याने ते दातांसाठी हानिकारक ठरू शकते.

५) स्वीट ब्रेड आणि बिस्किट्स जास्त प्रमाणात खाल्ल्यास दातांचे नुकसान होते. यामध्ये साखर आणि मैद्याचे प्रमाण जास्त असते. या दोन्ही गोष्टींमुळे दातांमध्ये कॅव्हिटी होते. यामुळे ब्रेड, बिस्कीट जास्त खाऊ नयेत.

६) टोमॅटो सॉसमुळे जेवण चविष्ट होत असले तरी जास्त प्रमणात टोमॅटो सॉस खाल्ल्याने दातांवर डाग पडतात. म्हणून दात पांढरेशुभ्र ठेवण्यासाठी टोमॅटो सॉस कमी प्रमाणात खावा.

७) लोणच्यामध्ये अ‍ॅसिडीक गुण असलेले व्हिनेगर असते. त्याचबरोबर लोणच्यामध्ये साखर असेल तर ते अधिक अ‍ॅसिडीक होते. यामुळे दातांना मजबूत ठेवण्यासाठी जास्त प्रमाणात लोणचे खाऊ नये.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु