पुरळ न होण्यासाठी लांब राहा रक्तशर्करा वाढवणाऱ्या आहारापासून

पुरळ न होण्यासाठी लांब राहा रक्तशर्करा वाढवणाऱ्या आहारापासून

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पावसाळ्यात दमट वातावरणामुळे चेहऱ्यावर पुरळ व पुटकुळ्या येतात. तेलकट त्वचा व केसांमुळे ही समस्या जास्त होते. त्यामुळे रक्तशर्करा वाढवणारा आहार टाळला पाहिजे. अशा आहारामुळे शरीरातील इंन्सुलीनच्या कार्यात बदल होऊन ग्रंथींची समस्या होते. कॉफी, गोड, मादक पदार्थ, कृत्रिम गोड पदार्थ यामुळे रक्तशर्करा वाढते.

अशी घ्या काळजी

* चेहरा नियमित स्वच्छ ठेवा, तसेच झोपण्यापूर्वी मेकअ‍ॅप काढा, यासाठी अल्कोहोल विरहित मेकअप रिमूव्हरचा वापर करा.

* एक्सफोलिएट केल्यामुळे त्वचेतील मृत कोशिका जातात. त्वचा तजेलदार होते. स्क्रब, फेसवॉश, क्रीम किंवा कोणत्याही हिरव्या भाजीपाल्याने चेहरा व शरीराची स्वच्छता करा.

* टोमॅटो लावून स्क्रब करा. २० ते २५ मिनिटांनंतर पुन्हा चेहरा धुऊन घ्या. यामुळे मृत त्वचा निघून जाईल. चेहरा उजळेल.

* चेहऱ्यावरुन वारंवार हात फिरवू नका. हातावरील जंतू चेहऱ्याला लागतात. यामुळे पुटकुळ्या, लालसर व काळे डाग पडतात.

* तेलकट त्वचा पुटकुळ्या वाढवते. त्वचा रुक्ष होऊन शरीर कृश बनते. रोज सकाळ, सध्याकाळी चेहरा पाण्याने धुतल्यानंतर मॉइश्चराइज करा.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु