मुलांना कोणत्या वयात शाळेत घालावे? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

मुलांना कोणत्या वयात शाळेत घालावे? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – मुलांना कोणत्या वयात शाळेत घालावे यावर जगभरात अनेकदा संशोधन करण्यात आले आहे. उत्तर यूरोपीय देशांत मुलांना खूप उशिराने मुलांना शाळेत दाखल केले जाते. फिनलँडमध्ये मुलांना ८ वर्ष वयानंतर शाळेत घातले जाते. जे पालक मुलांना पाचव्या वर्षाऐवजी सहाव्या वर्षी शाळेत पाठवतात, त्यांच्या मुलांच्यात ७ व्या आणि ११ व्या वर्षी उत्कृष्ट आत्मसंयम आढळून येतो. आत्मसंयम हा चांगल्या व्यक्तित्वाचा विशिष्ट गुण आहे. हा गुण मुले सुरुवातीच्या वयातच आत्मसात करतात. यामुळे भविष्यातील समस्यांवर सहज मात करु शकतात, अस स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीत शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात आढळून आले आहे.

असे केले संशोधन

१) संशोधक थॉमस डी आणि हॅन्स हेनरिक सीवर्जन यांनी या संशोधनासाठी दानिश नॅशनल बर्थ कोवर्टकडून माहिती गोळा केली होती.

२) संशोधकांनी ७ वर्ष वयाच्या मुलांच्या मानसिक आरोग्याची माहिती घेण्यासाठी ५४ हजार २४१ पालकांंची आणि ११ वर्ष वयाच्या मुलांच्या सुमारे ३५ हजार ९०२ पालकांची प्रतिक्रिया घेतली.

३) ज्या मुलांनी सरासरी मुलांच्या तुलनेने एक वर्ष उशिराने किंडरगार्टन सुरु केले होते त्यांच्यात हायपरअ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये सुमारे ७३ टक्के चांगला परफॉर्मस् आढळुन आला.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु