केसांच्या समस्यांनी त्रस्त आहात का? मग ‘हे’ उपाय करून दूर करा समस्या

केसांच्या समस्यांनी त्रस्त आहात का? मग ‘हे’ उपाय करून दूर करा समस्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – केस गळणे, निस्तेज होणे, वाढ खुंटणे, कोरडे होणे, चमक नाहीशी होणे आदी समस्या अलिकडे वाढत चालल्या आहेत. या समस्यांच्या पाठीमागे विविध कारणे असतात. केसांच्या समस्यांवर लोक अनेकप्रकारची महागडी औषधे खरेदी करून वापरतात. परंतु, आपण जो कंगवा केसांसाठी आयुष्यभर वापरतो, त्याच्याबाबत आपण कधीच विचार करत नाही. जर या समस्या दूर करायच्या असल्यास कंगवा बदलण्याची तयारी लवकरच करा. कारण लाकडी कंगवा तुमच्या या समस्या दूर करू शकतो.

लाकडी कंगव्याचे फायदे

कोंडा कमी होतो
केसात कोंडा झाला असल्यास लाकडी कंगवा वापरा. यामुळे कोंडा कमी होईल.

टाळूसाठी उपयुक्त
यामुळे टाळू निरोगी राहते. रक्तभिसरण चांगले होते. टाळू निरोगी राहिल्याने केसांचे आरोग्य सुधारते.

केसांची वाढ
लाकडी कंगव्याच्या वापरामुळे केसांची वाढ होऊन ते मजबूत होतात.

केस तुटत नाहीत
लाकडी कंगव्याने ओले केस विंचरल्यास इतर कंगव्याच्या तुलनेत केस कमी प्रमाणात तुटतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु