तुम्ही विसरभोळे आहात ? मग करा ‘हे’ उपाय

तुम्ही विसरभोळे आहात ? मग करा ‘हे’ उपाय

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – काहीजण अनेकवेळा काही गोष्टी विसरतात. त्यामुळे एखाद्यावेळी त्यांचे खूप मोठे नुकसान होऊ शकते. तर कधी विसरभोळे पणामुळे आपल्याला अनेकजण हसतात. त्यामुळे आपल्याला या विसभोळेपणाचे नेमके काय करावे हे कोणालाच समजत नाही. पण आपण जर योग्य आहार घेतला. आणि काही घरगुती उपाय केले तर आपण आपल्या विसरभोळेपणावर नियंत्रण करू शकतो.

१) व्यायामामुळे आपल्या मेंदूला व्यवस्थित रक्तपुरवठा होतो. मेंदूचे कार्य व्यवस्थित झाले की आपला विसरभोळेपणा कमी होतो. त्यामुळे नियमित व्यायाम करा.

२) चहा, कॉफी जास्त प्रमाणात घेतली तर आपल्याला विसरभोळेपणा येऊ शकतो. त्यामुळे चहा, कॉफ़ी कमी प्रमाणात घ्या. तुमच्या विसरभोळेपणावर लवकर नियंत्रण येऊ शकते.

३) आपली झोप जर व्यवस्थित झाली नाही तर आपल्याला विसरभोळेपणा येऊ शकतो. त्यामुळे कमीत कमी ८ तास झोप घ्या. त्यामुळे विसरभोळेपणावर नियंत्रण मिळवू शकता.

४) झोपण्याच्या अगोदर टीव्ही पाहणे टाळा. कारण टीव्ही पाहून नंतर झोपण्याचा प्रयत्न केला तर झोप येत नाही. यामुळे आपण अनेक गोष्टी विसरतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु