तुम्ही ‘प्रेग्‍नंट’ आहात का ? महिला जाणून घेऊ शकतात ‘या’ ७ नैसर्गिक पद्धतीने

तुम्ही ‘प्रेग्‍नंट’ आहात का ? महिला जाणून घेऊ शकतात ‘या’ ७ नैसर्गिक पद्धतीने

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – मासिक पाळी न आल्यामुळे महिला गरोदर आहेत की नाही हे निश्चित करता येत नाहीत. कारण तणाव, हार्मोन असंतुलन, अवेळी आयोग्य आहार अशा अनेक कारणांमुळे सुद्धा मासिक पाळी येत नाही. जर एखाद्या स्त्रीला पूर्णपणे गर्भावस्थेविषयी जाणून घ्यायचे असल्यास युरीन टेस्ट, ब्लड टेस्ट इत्यादी टेस्ट कराव्या लागतात. परंतु, काही नैसर्गिक पद्धतीनेही ही आनंदाची बातमी तुम्हाला समजू शकते. हे नैसर्गिक उपाय कोणते हे जाणून घेवूयात.

टूथपेस्ट

एका भांड्यात टूथपेस्ट घेऊन त्यामध्ये युरीन मिसळा. काही मिनिटानंतर टूथपेस्ट फेसाळ आणि निळ्या रंगाची झाल्यास याचा अर्थ तुम्ही गरोदर आहात.

शुगर टेस्ट

एका भांड्यात थोडीशी साखर घ्या. यामध्ये सकाळची पहिली युरीन मिसळा. कारण सकाळच्या वेळी युरीन जास्त सांद्र असते. जर साखर विरघळण्याऐवजी छोटे-छोटे गोळे तयार झाले तर याचा अर्थ तुम्ही गरोदर आहात.

युरीन कलेक्शन टेस्ट

सपाट पृष्ठभाग असलेल्या काचेच्या एक ग्लासमध्ये युरीन घ्या. थोडावेळ ग्लास तसाच ठेवा. थोड्यावेळानी ग्लासातील युरीनवर सफेद रंगाचा थर तयार झाल्यास याचा अर्थ तुम्ही गरोदर आहात.

व्हिनेगर

एका भांड्यात युरीन आणि व्हिनेगर एकत्र करा. काही मिनिटानंतर व्हिनेगरचा रंग बदलल्यास याचा अर्थ तुम्ही आई होणार आहात.

सिंहपर्णीचे पान

एका भांड्यात सिंहपर्णीचे पान घ्या. या पानांवर युरीन टाकून १० मिनिट थांबा. दहा मिनिटानंतर पानांवर लाल रंगाचे ठिपके दिसल्यास याचा अर्थ तुम्ही गरोदर आहात.

गहू, जवस

एका भांड्यात गहू आणि जवस घेऊन त्यामध्ये युरीन मिसळा. जर एक दिवसानंतर हे धान्य अंकुरित झाले तर याचा अर्थ तुम्ही गरोदर आहात.

साबण

एक भांड्यामध्ये साबण आणि युरीन एकत्र मिसळून घ्या. जर साबणावर फेस आणि बुडबुडे आले तर याचा अर्थ तुम्ही गरोदर आहात.

 या नैसर्गिक गर्भावस्था टेस्ट १०० टक्के अचूक असतील असे नाही. फक्त प्राथमिक स्तरावर तुम्ही गरोदर आहात की नाही हे जाणून घेण्यासाठी या टेस्ट केल्या जाऊ शकतात. गर्भावस्थेची योग्य पुष्टी करण्यासाठी डॉक्टरांकडेच जावे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु