सफरचंदच्या बिया विषारी, जाणून घ्या काही पदार्थांच्या रंजक १० बाबी

सफरचंदच्या बिया विषारी, जाणून घ्या काही पदार्थांच्या रंजक १० बाबी

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – दिवसभरात आपल्या खाण्यात विविध पदार्थ येत असतात. मात्र, कोणत्या पदार्थातून कोणते पोषकतत्त्व मिळतात याची आपल्याला माहिती नसते. काही हानिकारक बाबी सुद्धा आहारासोबत आपल्या पोटात जात असतात. अशा पदार्थांची माहिती असणे खूप गरजेचे असते. आपण अशा दहा पदार्थांची माहिती घेणार आहोत, शिवाय ते शरीरासाठी लाभदायक आहेत अथवा नाही, हे जाणून घेणार आहोत. सफरचंद खाल्ल्याने प्रकृती ठणठणीत राहते. पण त्याच्या बिया फार विषारी असतात. शिवाय काही पदार्थ एवढे आगळेवेगळे असतात की त्यातून रंजक माहिती पुढे येते.

केळी खाण्यापेक्षा त्याचा नुसता वास घेवून वजन कमी करता येते. यावर सहज विश्वास बसणार नाही. परंतु, हे खरे आहे. एका अभ्यासादरम्यान हे स्पष्ट झाले आहे की, जर एखाद्याने केळीचा वास घेतल्यास त्याचे वजन कमी होते. केळीचा वास घेतल्याने त्यामध्ये असणारा  नैसर्गिक गोडपणा हा भुकेवर अंकुश मिळवतो. वजन कमी करायचे असेल तर केळीचा वास घेवून वजन कमी करणे शक्य आहे. हिरवे सफरचंद, व्हॅनिला अथवा पेपरमिंट याचा वास घेवून देखील वजन कमी करणे शक्य आहे.

या आहेत रंजक गोष्टी 

* एखादे फुल त्याच्या वासावरून ओळखले जाते. पण कांदा, बटाटा आणि सफरचंद यांची चव एक सारखीच असते असे सांगितले तर विश्वास बसणार नाही. पण हे सत्य आहे. नाक बंद करून या तिन्हीची चव घेतली तर ती सारखीच लागेल.

* मध कितीही जुने असले तरी चांगलेच राहते. १०० वर्षापुर्वीचे मधही खाता येते. मध सांडल्यावर कधीच पसरत नाही. शास्त्रज्ञांना इजिप्शियन टोम्समध्ये मोठ्या प्रमाणात मध सापडले आहे. त्यात असणारे अ‍ॅसिडिक नेचर, हायडड्ढोजन द्रव आणि पाणी यामुळे कितीही वर्ष ते चांगले राहू शकते.

* डाव्य हाताने जेवण केले तर नेहमीच्या जेवणापेक्षा जेवण कमी जाते. दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठातील एका अभ्यासानुसार हा निर्कष काढण्यात आला आहे.

* जुन्या पेपरचा वास हा व्हॉनिला सारखा येत असतो. कागद बनवण्यासाठी झाडातील लिगनिनचा वापर करतात. वातावरणापासून कागद वेगळा ठेवल्यास त्यातील लिगनिन एकमेकापासून तुटतात. हे लिगनिन तुटल्यानंतर त्याचे रूपातर व्हॉनिलिनमध्ये होते. त्यामुळे जुन्या पेपरचा वास हा व्हॉनिला फ्लेव्हर सारखा असतो.

* सफरचंदाच्या बिया जर जास्त प्रमाणात पोटात गेल्या तर विषबाधा होण्याची शक्यता असते. सफरचंदातील बिया खाल्यास पोटात त्रास होऊ शकतो.

* अस्वलाचे यकृत खाणे जीवघेणे ठरु शकते. काही ध्रुवांवरचे लोक अस्वलाचे यकृत खातात. पण असे यकृत खाणे हे जीवघेणे असते. अस्वलाच्या यकृतामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन अ असते. जे सामान्य माणसाला पचवणे शक्य नसते. त्यामुळे अस्वलाचे यकृत खाणे टाळावे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु