सुरकुत्यांपासून होईल बचाव, घरीच करा ‘हा’ अँटी एजिंग उपाय, दिसाल तरुण

सुरकुत्यांपासून होईल बचाव, घरीच करा ‘हा’ अँटी एजिंग उपाय, दिसाल तरुण

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सुरकुत्यांमुळे चेहरा वयस्क वाटू लागतो. या सुरकुत्या घालवण्यासाठी बाजारात अनेक क्रीम्स उपलब्ध असल्या तरी त्या खुपच महाग असतात. त्या नियमित वापरणे खुपच खर्चिक ठरते. मात्र घरच्या घरी काही नैसर्गिक पदार्थ वापरून केलेला उपाय अधिक परिणामकारक आणि स्वस्त ठरतो. हा उपाय कोणता आणि त्याचे फायदे, याविषयी माहिती घेवूयात.

हे साहित्य घ्या
एक चमचा मध, एक चमचा ऑलिव्ह ऑइल, एक चमचा मुलेठी पावडर, एक केळी, एक अंडे, लिंबूचा रस, एक चमचा दही.

असे तयार करा
केळी, अंड्याचा पांढरा भाग, दही, मध, मुलेठी पावडर, लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑइल एकत्र करून त्याची पेस्ट तयार करून घ्या. तयार केलेली पेस्ट हलक्या हातांनी ५ मिनिटे मसाज करून चेहरा आणि मानेवर पेस्ट लावा. दहा मिनिटांनंतर चेहरा धुवून घ्या.

हे आहेत फायदे

१) सुरकुत्या, डाग दूर होतात. त्वचा चमकदार होते.

२) त्वचा रिजुविनेट आणि मॉइश्चराइज होते. चमक आणि मऊपणा वाढतो.

३) त्वचा मॉश्चराइज राहते. मुरुमाची समस्या दूर होते.

४) त्वचा स्वच्छ होते. गोरेपणा वाढतो. टॅनिंग दूर होते. चमक येते.

५) त्वचा नरिश आणि रिव्हाइटलाइज होते. त्वचा मऊ होते आणि तेलकट दिसत नाही.

६) त्वचा टाइट होते आणि सुरकुत्या दिसत नाहीत.

७) त्वचेचा संसर्गापासून बचाव होतो. त्वचा आरोग्यदायी आणि तरुण होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु