नपुंसकतेवर प्रभावी औषध आहे ‘हे’ रोप, प्राचीन काळापासून होत आहे वापर

नपुंसकतेवर प्रभावी औषध आहे ‘हे’ रोप, प्राचीन काळापासून होत आहे वापर

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – अक्कलकरा म्हणजेच अक्कलकाढा ही एक औषधी वनस्पती आहे. प्राचीन ग्रंथांमध्ये या वनस्पतीच्या उपयांबाबत उल्लेख आहे. दातांशी संबंधित आजारांवर अक्कलकरा गुणकारी आहे. अक्कलकरा ही वनस्पती शारीरिक शक्ती वाढवणारी आणि नपुंसकता दूर करणारी असल्याने दुर्गम भागातील काही आदिवासी याचा वापर करतात. अक्कलकराचे वनस्पतिक नाव स्पाईलेन्थस ओलेरेसिया असे आहे. या वनस्पतीच्या काही घरगुती उपायांची माहिती आपण घेणार आहोत.

हे आहेत उपाय

१ अक्कलकराची फुले, मुळांचा काढा घेतल्यास शारीरिक कमजोरी दूर होते. अक्कलकराचा काढा दररोज ४ ग्रॅम या प्रमाणात रात्री झोपण्यापूर्वी घेतल्यास नपुंसकता दूर होते.

२ अश्वगंधा, पुनर्नवा आणि अक्कलकरा समान मात्रेमध्ये घ्या. या मिश्रणाचे दिवसातून दोन वेळेस सेवन केल्यास शारीरिक कमजोरी दूर होते.

३ अक्कलकरा आणि कापूर समान मात्रेत घेऊन मंजन तयार करा. या मंजनाने दात घासल्यास दातदुखी दूर होते.

४ मुल तोतरे, बोबडे बोलत असेल तर अक्कलकराच्या सुकलेल्या फुलांचे २५० मि. ग्रॅम. चूर्ण मधासोबत दिवसातून दोनवेळेस द्यावे.

५ अक्कलकराचे चूर्ण घेतल्यास अन्न चांगले पचन होते. पोटात गॅस होत नाहीत.

६ फिट्स येत असल्यास १०० ग्रॅम अक्कलकरा लिंबू सत्वामध्ये एकजीव करून या मिश्रणामध्ये १०० ग्रॅम मध मिसळावे. हे मिश्रण ५ ग्रॅम या प्रमाणात दररोज सकाळी घ्यावे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु