पुस्तक वाचनाच्या सवयीमुळे ‘अल्झायमर’सारखा आजार राहतो दूर! जाणून घ्या

पुस्तक वाचनाच्या सवयीमुळे ‘अल्झायमर’सारखा आजार राहतो दूर! जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन टीम : पुस्तक वाचनाची आवड असण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे तुमची बुद्धी वाढते, ज्ञानात भर पडते, शब्दसंपत्ती वाढते, असे विविध फायदे होतात. परंतु, हातात पुस्तक धरून वाचन केल्याने आरोग्याच्या दृष्टीनेही काही फायदे होतात. या सवयीमुळे अल्झायमरसारखा आजार चार हात दूर राहतो, असे संशोधनात आढळून आले आहे.

हे लक्षात ठेवा
हातात पुस्तक आणि पेपर धरून वाचण करण्याची आवड आता कमी होत चालली आहे. कारण ऑनलाइन वाचन सहज आणि सोपे झाले आहे.

शारीरीक आणि मानसिक विकास व्हावा असे वाटत असेल तर वाचनाची सवय लावून घेतली पाहिजे.

वाचन म्हणजे एका जागी निवांत बसून हातात पुस्तक धरून वाचणे होय.

वाचनाचे शरीर आणि मनावर चांगले आणि सकारात्मक परिणाम होतात, असे संशोधनातून दिसून येते.

झोपण्याआधी वाचन करण्याची सवय असल्यास चांगली झोप लागते. मन आणि बुध्दी शांत होते. हातात धरून पुस्तक वाचनामुळे मनाला खरी शांतता मिळते.

मुलांना रोज मोठ्याने गोष्टी वाचायला सांगा. पुढे ही सवय वाढत जाईल.

मुले मोठ्याने वाचत असतील तर त्यांना रागावू नका. मनातल्या मनात वाचण्याचा आग्रह करू नका.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु