नेहमी हसा, च्युइंगम खा…आणि कमी करा वजन ! ‘वेटलॉस’च्या ‘या’ खास ५ ट्रीक

नेहमी हसा, च्युइंगम खा…आणि कमी करा वजन ! ‘वेटलॉस’च्या ‘या’ खास ५ ट्रीक

आरोग्यानामा ऑनलाईन टीम : सध्या वजन कमी करण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत असल्याचे सर्वत्र दिसून येते. वाढते वजन ही एक समस्यांना सर्वांनाच भेडसावत आहे. जिम, डाएट आणि अन्य उपायांवर पाण्यासारखा पैसा खर्च करूनही अनेकदा यात यश येत नाही. यासाठी आपण किती कॅलरीज घेतो आणि किती जाळतो याची योग्य माहिती असणे खुप गरजेचे आहे. परंतु, जास्त पैसा खर्च न करता आणि जास्त श्रम न करतादेखील वजन कमी होऊ शकते. यासाठी काय करावे, ते जाणून घेवूयात.

या आहेत खास पद्धती
१ एक रूपयासुद्धा खर्च न करता वजन कमी करण्यासाठी १९ डिग्री तापमान असलेल्या खोलीत झोपावे. यामुळे ७ टक्क्यांपेक्षा जास्त वेगाने कॅलरी बर्न होतात. थंडीत वजन कमी होण्यामागे हेच कारण आहे.

२ शास्त्रज्ञ सांगतात की, जास्त वजन असलेली मुले आणि तरूणांसाठी थंड पाणीसुद्धा लाभदायक आहे. जेव्हा शरीराला थंड पाणी मिळते तेव्हा शरीर या पाण्याला गरम करण्यास सुरूवात करते. यात भरपूर उर्जा खर्च होते. शरीराचे तापमान सामान्य आणि मेटाबॉलिज्म योग्य राहिल्याने वजन वेगाने कमी होते.

३ हसल्याने मानसिक आणि शारीरीक आरोग्य चांगले राहते. एका अभ्यासानुसार सतत हसल्याने मेटाबॉलिज्म रेट १०-२० टक्के वाढतो. यामुळे शरीरातील कॅलरीज वेगाने बर्न होतात आणि वजन कमी होते.

४ रक्तदान केल्यानेही शरीरातील कॅलरीज मोठ्याप्रमाणात बाहेर येतात. रक्तदान केल्यानंतर पुन्हा प्रोटीन, लाल रक्तपेशी आणि अन्य घटक मिळवण्यासाठी शरीराची जास्त उर्जा खर्च होते. यामुळे वजन कमी होते.

५ काहीही न करता वजन कमी करायचे असल्यास च्यूइंगम खाणे सुरू करा. दिवसभरात केवळ वीस मिनिटे हे चावल्यास वजन कमी होऊ शकते. यामुळे मेटाबॉलिज्म रेट वाढतो. मोठ्या प्रमाणात कॅलरीज बर्न होतात. परंतु, च्युइंगम शुगर फ्री असावे.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु