‘बदाम’ वाढवतो उत्साह, तर दह्यातून मिळते उर्जा ! जाणून घ्या फायदे

‘बदाम’ वाढवतो उत्साह, तर दह्यातून मिळते उर्जा ! जाणून घ्या फायदे
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पौष्टिक जेवण बनवण्यासाठी वेगवेगळ्या रेसिपीज शिकत राहणे चांगले असते. अशा पद्धतीने सकाळी न्याहरीत तसेच दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात पौष्टिक पदार्थ खाता येतील. लवकर आणि सहजपणे तयार होणाऱ्या पदार्थांचा आपल्या यादीत समावेश करावा. रेसिपजची अशा पद्धतीने माहिती घेतल्यास पौष्टिक पदार्थांची माहिती मिळू शकते. बदाम आणि दही हे खूप पौष्टिक असून त्याचा आहारात नियमित उपयोग केल्यास आरोग्य चांगले राहू शकते. बदामाच्या सेवनाने शरीराचा उत्साह वाढतो, तर दह्यामुळे शरीराला उर्जा मिळते.

बदामात ऊर्जा वाढवणारी भरपूर प्रथिने असतात. याच्या सेवनाने दिवसभराची ऊर्जेची गरज भागवली जाऊ शकते. यात व्हिटॅमिन ई-मँगनीज, मॅग्नेशियम, ट्रायप्टोफेन आणि कॉपर यासारखे भरपूर एनर्जी बुस्टर घटक असतात. बदामाचे सेवन केल्याने ब्लड शुगर नियंत्रित राहते आणि पचनही व्यवस्थित होते. त्यामुळे ऊर्जेची गरज पूर्ण होते.

दिवसभराच्या ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी दह्याचे सेवन करणे चांगला पर्याय आहे. दह्यात कॅल्शियम, फॉस्फरस, प्रथिने, मॉलीबेडिनम आणि झिंक असते. दही लवकर पचते आणि शरीरात सहजपणे विरघळते. त्यामुळे ऊर्जा पातळी लवकर वाढवता येते. केवळ दह्यात आढळून येणारी प्रथिने अत्यंत हळूहळू पचतात. त्यामुळे दही खाल्ल्यानंतर उशिरापर्यंत काही खाण्याची गरज भासत नाही.

जेवणासोबत दही खाणे सर्वात चांगले आहे. साखर किंवा मीठ टाकूनही दही खाता येते. तसेच फळांच्या सलाडसोबत दही खाणे खूप फायदेशीर ठरते.

तसेच अननस हे एक चवदार आणि पाणीदार फळ आहे. यात आरोग्यासाठी आवश्यक असलेले भरपूर घटक आढळून येतात. मँगनीज, क आणि बी-१ जीवनसत्त्व, कॉपर, फायबर आणि व्हिटॅमिन बी-६ जास्त प्रमाणात आढळून येते. यात साखरही असते. साखरेमुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. अननस खाल्ल्याने दहा मिनिटानंतर ताजेतवाने वाटते. अननसाचा रस पिणे अत्यंत फायद्याचे आहे. अननसाचे सलाडही बनवता येते.

दिवसभर कार्यक्षम राहण्यासाठी जेवणातून पुरेशी ऊर्जा मिळत राहणे गरजेचे आहे. अनेकदा आहारात उपलब्ध असलेले पदार्थ शरीराला पूर्णपणे पोषण देऊ शकत नाहीत. त्यामुळे दिवसभर थकवा आणि आळस जाणवतो. यापासून बचाव करण्यासाठी काही खास स्नॅक्सचा आहारात समावेश करावा. खरेदीसाठी बाहेर गेल्यावर आरोग्यासाठी फायदेशीर खाद्यपदार्थ आणावेत. यामुळे घरातील सर्वांना पौष्टिक पदार्थ खाण्याची सवय लागते. जंक फूड किंवा अशा प्रकारच्या पदार्थांऐवजी फळे किंवा सुका मेवा खरेदी करावा.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु