तिशीनंतर पुरूषांनी कराव्यात ‘या’ 6 तपासण्या, टाळू शकता आरोग्य समस्या

तिशीनंतर पुरूषांनी कराव्यात ‘या’ 6 तपासण्या, टाळू शकता आरोग्य समस्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – तिशीत प्रवेश केलेल्या पुरूषांवर जबाबदारीचे ओझे वाढलेले असते. वयदेखील वाढलेले असते. अशावेळी विविध आजार सुद्धा डोके बाहेर काढू शकतात. परंतु, वेळीच काही आरोग्य तपासण्या केल्या तर हे आजार टाळता येणे सहज शक्य आहे. यामुळे तुम्ही भविष्यातील धोक्यांपासून वाचू शकता. पुरूषांनी वयाच्या तिशीत कोणत्या सहा आरोग्य तपासण्या कराव्यात याविषयी आपण माहिती घेणार आहोत.

मधुमेह
मधुमेह हा आजार सामान्य आजार नसून यामुळे इतर आजारही होऊ शकतात. योग्य आहार घेतल्यास मधुमेहाची शक्यता ५८ टक्के कमी करता येऊ शकते, असे तज्ज्ञ सांगतात. तिशीत व नंतर मधुमेहाची तपासणी वर्षातून एकदा तरी करावी.

एचआयव्ही
एचआयव्हीने ग्रस्त असलेल्या ३३ टक्के लोकांना लागण झाल्याचे कळत नाही, असे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे. पुरूषांनी पाचवर्षातून एकदा ही तपासणी केली पाहिजे.

टेस्टिक्युलर कँसर
२० ते २९ वयाच्या पुरूषांना टेस्टिक्युलर कँसर होणे हे सामान्य समजले जाते. याचे वेळीच निदान झाले तर हा आजार उपचारांनी सहज बरा होऊ शकतो.

कोलेस्टेरॉल
एलडीएल कोलेस्टेरॉल म्हणजेच वाईट कोलेस्टेरॉलमुळे हार्ट अटॅकची समस्या उद्भवू शकते. परंतु, हार्टअटॅकच्या पन्नास टक्के प्रकारणात एलडीएलचा स्तर सामान्य असल्याचे दिसून आले आहे. हृदयरोग, रक्तदाब असल्यास हृदयाची नियमित तपासणी केली पाहिजे. पुरूषांनी पाच वर्षांतून एकदा आपल्या कोलेस्टेरॉलची तपासणी केली पाहिजे.

बीएमआय
लठ्ठपणामुळे अनेक आजार जडतात. बीएमआय तपासणी यासाठीच केली जाते. यामुळे उंची, वयानुसार वजन ठरवले जाते. वजन जास्त असल्यास या तपासणीतून समजते. पुरुषांनी वजन वाढले असल्यास तीन वर्षांत एकदा ही तपासणी करून घ्यावी.

दातांची तपासणी
दाताच्या समस्या आणि हृदयरोग याचा थेट संबंध आहे. तोंडातील बॅक्टेरिया रक्ताच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करतात तेव्हा हृदयापर्यंत रक्तवहन करत असलेल्या धमन्यांमध्ये या बॅक्टेरियांमुळे सूज येऊ शकते. परंतु, वेळीच दाताची तपासणी करून घेतल्यास ही समस्या टाळता येते. पुरूषांनी वर्षातून दोनवेळा दातांची तपासणी करून घ्यावी.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु