पावसाळ्यात १ कप ‘लवंग चहा’ तुम्हाला ठेवतो निरोगी, होतील ‘हे’ ६ फायदे

पावसाळ्यात १ कप ‘लवंग चहा’ तुम्हाला ठेवतो निरोगी, होतील ‘हे’ ६ फायदे

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पावसाळ्यात व्हायरल इन्फेक्शन होण्याचा धोका जास्त असतो. अशा वेळी आपण पावसाळ्यातील वातावरणात बॅक्टेरिया तसेच विविध रोगजंतू वेगाने वाढतात. यामुळे विविध आजारांच्या साथी वेगाने पसरतात. सदी, खोकला, ताप असे आजार पावळ्यात होणे सामान्य समजले जाते. हे आजार दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय केल्यास चांगला फरक पडतो. रोज सकाळी लवंगचा चहा प्यायला तर अशा आजारांपासून बचाव होतो.

असा तयार करा चहा
एक कप पाण्यात पाच लवंग बारीक करुन टाका. यामध्ये चिमुटभर चहापत्ती मिसळून पाच ते आठ मिनिटे उकळवा. कोमट झाल्यावर हे चहाप्रमाणे प्यावे.

हे आहेत फायदे
१) लवंगेचा चहा प्यायल्याने सर्दी, खोकला आणि पडस्यापासून बचाव होतो.
२) पचनक्रिया सुरळीत होते. पोट खराब होत नाही.
३) दातदुखीपासून आराम मिळतो.
४) बॅक्टेरिया नष्ट झाल्याने हिरड्या निरोगी राहतात.
५) कफ आणि घशाच्या समस्यांपासून आराम मिळतो. इन्फेक्शन दूर होते.
६) यातील यूगेनॉलमुळे शरीरात साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. डायबिटीजचा धोका कमी होतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु