सतत तणावग्रस्त राहिल्यास चेहऱ्याची चमक फिकी पडते

सतत तणावग्रस्त राहिल्यास चेहऱ्याची चमक फिकी पडते

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आपल्या चेहऱ्यावर एक नैसर्गिक चमक असते. चेहरा तजेलदार दिसण्यासाठी महिलांसह पुरूषही विविध प्रकारची प्रॉडक्ट वापरताना दिसतात. परंतु, अशी प्रॉडक्ट वापरूनही अनेकदा त्याचा फायदा होताना दिसत नाही. कारण, तुम्ही जर सतत तणावाखाली वावरत असाल तर चेहऱ्यावरील चमक फिकी पडू शकते. सतत मानसिक तणाव असल्यास कार्टिसोल हार्मोन चेहऱ्याची नैसर्गिक चमक नष्ट करतो. यामुळे चेहरा रूक्ष होतो, तारुण्यपीटिका येणे, डोळ्यांखाली काळे चट्टे येणे, त्यात सूज येणे तसेच सुरकुत्या येणे, असे त्रास उद्भवतात. तणावामुळे शास्त्रीयदृष्ट्या त्वचेला नुकसान पोहोचते. अशा वाईट परिणामांपासून बचाव करता आला पाहिजे. यासाठी काही उपाय असून ते केल्यास चेहऱ्याचे तेज कामय राहू शकते.

तणाव असल्यास चेहरा लाल पडू शकतो. तणावग्रस्त असल्यावर रक्तप्रवाह वेगाने होतो आणि चेर्हयाच्या छोट्या-छोट्या रक्तवाहिन्या पसरायला लागतात. तसेच तणावामुळे चेहराही लाल पडतो. यालाच वैद्यकीय भाषेत रोजेशिया म्हणतात. त्वचेशी संबंधित ही समस्या उद्भवल्यास चेहरा सुजल्यासारखा सुद्धा वाटतो. अशावेळी शरीराची प्रतिकारशक्तीही कमकुवत होते. अशी समस्या झाल्यास तणावमुक्त राहण्यासाठी डीप ब्रिदिंग, योगासने आणि ध्यान धारणा यांची मदत घ्यावी. जर तुम्ही रोजेशियाने पीडित असाल तर तोबडतोब डर्मेटोलॉजिस्टकडे जाऊन तपासणी करून घेतली पाहिजे.

एखादी व्यक्त सतत तणावाखाली असेल तर तिचे डोळे थकलेले दिसतात. अधिक चिंताग्रस्त असल्यामुळे झोपेवर त्याचा वाईट परिणाम होतो. यामुळे डोळ्यांखाली सूज आल्यासारखे दिसून येते. डोळे थकलेले दिसतात. यावर उपाय करण्यासाठी काकडीच्या छोट्या चकत्या डोळ्यांवर ठेवाव्यात. यामुळे डोळ्यांची सूज वाढवणारे रक्त आणि लिंफ वेसेल सामान्य होण्यास मदत होते. तसेच झोपताना चेहरा थोडा उंचीवर ठेवून झोपावे. तसेच तणावामुळे त्वचेचा रूक्षपणा देखील वाढतो. क्रॉनिक स्ट्रेट आजार असल्यास सक्रिय होर्णाया कार्टिसोल हार्मोनमुळे त्वचेची पाणी किंवा ओलावा रोखण्याची क्षमता कमजोर होते. यामुळे चेहऱ्याची नैसर्गिक चमक नष्ट होते. असा त्रास होत असल्यास चेहरा कोमट पाण्याने धुवावा, जेणेकरून चेहऱ्यावरील तेल नाहीसे होईल. चेहऱ्यावर ड्राय क्रीम न लावता ओली क्रीम लावावी. तसेच भरपूर पाणी प्यावे.

एखादी व्यक्ती सतत मानसिक तणावाखाली असल्यास चेहऱ्यावर सुरकुत्या येतात. कार्टिसोल हार्मोन ब्लड शुगर वाढवण्यासाठी जबाबदार असतो. यामुळे शरीरात ग्लायकेशनची प्रक्रिया सुरू होते. अशा स्थितीत त्वचेचा लवचीकपणा आणि मऊपणा कायम राखर्णाया कोलेजन आणि इलेस्टिन नावाच्या प्रोटिन फायबरला नुकसान पोहोचते. चेहऱ्याचे स्नायू लागोपाठ तणावग्रस्त राहत असल्याने वेळेपूर्वी सुरकुत्या येण्याची शक्यता वाढते. ही समस्या जाणवत असल्यास कोलेजनची कार्यप्रणाली चांगली ठेवण्यासाठी अँटिऑक्सिडंट्स महत्त्वाचे असतात. त्यामुळे अ, क जीवनसत्त्व आणि बीटाकॅरोटीन असलेले खाद्यपदार्थ खावेत.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु