कामाचा डोंगर उपसण्यासाठी उर्जा कशी मिळवाल ? ‘या’ ७ गोष्टी लक्षात ठेवा

कामाचा डोंगर उपसण्यासाठी उर्जा कशी मिळवाल ? ‘या’ ७ गोष्टी लक्षात ठेवा

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – अनेकांच्या समोर कामाचा एवढा व्याप असतो, की तो उरकायचा कसा? असा प्रश्न त्यांना पडलेला असतो. शिवाय, ही कामे हातावेगळी केली की पुन्हा दुसरी कामे हजर असतातच. काम करण्यासाठी शारीरीक उर्जा खुप महत्वाची असली तरी एवढी उर्जा आणायची कुठून ? हा प्रश्न आहेच. ही पॉझिटिव्ह एनर्जी कशी निर्माण करायची, याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

हे लक्षात ठेवा

१. उर्जा मिळवण्यासाठी दिवसाची सुरुवात अतिशय महत्त्वाची असते. ज्या दिवशीची सकाळ उत्साहात जाते, तो दिवस आनंदी असतो. त्यामुळे सकाळ खराब होणार नाही, सकाळचा मूड चांगला राहील याकडे लक्ष द्या.
२. सकाळी मेडिटेशन, ध्यानधारणा करा.
३. थोडे रिलॅक्स व्हायला शिका.
४. कामाच्या व्यापात स्वत:ला वाहवून घेताना अधूनमधून थोडे थांबा. हे रिलॅक्सेशन नवे बळ देते.
५. टारगेट्सच्या प्रेशरखाली न जगता, वर्तमानात जगायला शिका, हा वर्तमान खुप काही देतो.
६. संगीत ऐका. यामुळे ताणतणावांपासूनही मुक्ती मिळेल. रिलॅक्स, ताजेतवाने व्हाल. मूडही चांगला होईल.
७. चांगली मनस्थिती कायम वाढीव शक्ती पुरवते. त्याचा सुयोग्य वापर करा.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु