जास्त किंवा कमी झोपेमुळे आजारी पडू शकता, ‘हे’ ४ नियम आवश्य पाळा

जास्त किंवा कमी झोपेमुळे आजारी पडू शकता, ‘हे’ ४ नियम आवश्य पाळा

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – झोप जास्त किंवा कमी झाल्यास माणूस आजारी पडू शकतो. झोपण्याचा कालावधी आणि वेळा याविषयी शिस्त बाळगणे गरजेचे असते. झोप आणि आपले आरोग्य याचा थेट संबंध आहे. जर चांगले आरोग्य हवे असतेल तर झोपेची शिस्त पाळलीच पाहिजे. रात्रभर जागरण करून कितीही चांगले काम केले तरी त्याचे शरीरावरील परिणाम हे वाईटच होत असतात. चांगले आरोग्य मिळवण्यासाठी झोपेचे नियम कटाक्षाने पाळले पाहिजेत.

हे लक्षात ठेवा

१ ) शयनकक्षात गेल्यानंतर शरीरातील कंपने अगोदर दूर करा. पाय एकमेकांना जोडून तसेच हात जोडून उभे राहा. यामुळे शरीर दोलकासारखे हलकेफुलके वाटू लागेल. त्याचाच अर्थ दिवसभर आंतरिक व्यक्तित्त्वाने एवढ्या प्रमाणात व्हायब्रेशन केले. कंपने थांबल्यानंतर बसा.

२) झोपण्यापूर्वी पाठ ताठ ठेवून बसा आणि लक्ष दोन भुवयांच्या मधोमध केंद्रित करा. हा कालावधी वाढविल्यास जास्त लाभ होऊ शकतो.

३) विचारशून्य होण्याचा प्रयत्न करा. सर्व विचार एकाच प्रयत्नात दूर होणे अशक्य असते.

४) विचार दूर होणे अवघड असल्याने परमात्म्याच्या आवडीच्या स्वरूपाला दोन्ही भुवयात आणा. अथवा आई-वडील, गुरूचेही दर्शन घेता येईल.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु