महिलांनो, व्यायामामुळे कमी होईल ‘ब्रेस्ट कॅन्सर’ चा धोका ! हे आहेत 6 फायदे

महिलांनो, व्यायामामुळे कमी होईल ‘ब्रेस्ट कॅन्सर’ चा धोका ! हे आहेत 6 फायदे

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – नियमित व्यायाम करत असलेल्या महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण कमी आढळते. अशा महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचा धोका 20 ते 30 टक्क्यांनी कमी होतो. तसेच कॅन्सर झाल्यानंतर, उपचारांती बèया झालेल्या महिलांनीही नियमित व्यायाम केला तर पुन्हा आजार होण्याचे प्रमाणही कमी होते. जर्मन कॅन्सर एड या संस्थेने हे संशोधन केले आहे.

व्यायाम महिलांसाठी का आवश्यक

1) कॅन्सरसारख्या आजारांची शक्यताही 20 ते 30 टक्कयांनी कमी होते.

2) आधुनिक स्तनकर्करोग उपचारपद्धतीतही व्यायामाचे मोठा भाग आहे.

3) व्यायाम केल्याने कॅन्सर पेशन्टना येणारा फटीग कमी होतो. उदास कमी वाटते.

4) केमोथेरपी सुरु असतानाही ज्या महिला नियमित व्यायाम करतात त्यांना केमोचे दुष्परिणामही कमी जाणवतात.

5) उपचारानंतर पोस्ट थेरपी म्हणूनही नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे.

6) नियमित व्यायाम, नियमित चाचण्या, योग्य आहारामुळे कर्करोगासारख्या आजारांवर नियंत्रण शक्य आहे.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु