मधुमेह असणाऱ्या रूग्णांनी फळं कधी खावीत?

मधुमेह असणाऱ्या रूग्णांनी फळं कधी खावीत?
आरोग्यनामा ऑनलाइन – मधुमेहाच्या रूग्णांना शरीरातील साखरेच्या नियंत्रण ठेवण्यासाठी नेहमीच प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी विविध प्रकारची औषधं घ्यावी लागात. अशा रूग्णांसाठी पथ्यदेखील खूप असतं. ज्या पदार्थामध्ये साखर असते ते सेवन करता येत नाहीत. यामध्ये फळं सुद्धा येतात. ज्या फळांमध्ये अधिक प्रमाणात साखर असते अशी फळं शक्यतो खाणं टाळलं जातं. अशा रूग्णांनी फळं केव्हा खावीत हे जाणून घेतलं पाहिजे.
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, टाईप २ मधुमेही रूग्णांनी दुपार आणि रात्रीच्या जेवणाच्या वेळी फळं खायला हवीत. टाईप १ मधुमेहाने ग्रस्त रूग्णंनी इन्सुलिन अ‍ॅक्टीव असताना फळांचं सेवन करावं. मधुमेही रूग्णांनी फळं खाताना त्याची वेळ ठरवली पाहिजे. जर वेळेवर फळांचं सेवन केलं नाही तर रक्तातील शर्करा वाढण्याची भीती असते. ज्या फळांमध्ये अधिक प्रमाणात साखर असते अशी फळं खाणं मधुमेहाच्या रूग्णांनी टाळलं पाहिजे. द्राक्ष, केळी, आंबा, चिकू, सिताफळ ही फळं मेधुमेहींनी खाऊ नयेत. पेरू, पेरं, कलिंगड, सफरचंद अशी कमी शर्करा असलेली फळं सेवन केली पाहिजेत. थोडी कच्ची फळं खाणं आरोग्यासाठी उत्तम असतं.
जास्त पिकलेली फळं खाल्ल्यास शरीरात साखरेचं प्रमाण वाढण्याची शक्यता असते. दिवसातून एक बाऊल भरून मिक्स फळं खाणं मधुमेहींसाठी चांगलं असतं. मधुमेही रूग्णांनी सकाळी ११ वाजता किंवा संध्याकाळी ५ वाजता फळं खावीत. दोन जेवणांच्या वेळांच्या मध्ये फळं खाण्याची वेळ ठेवावी. रात्रीच्या वेळेस शक्यतो फळं खाऊ नयेत. रात्री फळं खायचीच असतील तर रात्रीच्या जेवणानंतर दोन तासांनी खावीत.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु