पाणी शरीरासाठी आवश्यकच, पण अतिरेक टाळा

पाणी शरीरासाठी आवश्यकच, पण अतिरेक टाळा

पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन – पाणी आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असून शरीरासाठी पाणी खुपच आवश्यक आहे. पण, पाणी किती प्यावं ते शुद्ध आहे का, यास खुप महत्व आहे. त्यामुळे पाणी पिण्याचा अतिरेकही त्रास दायक ठरू शकतो. आरोग्य उत्तम राखण्यासाठीही पाणी मदत करतं. वजन कमी करायचं असेल तर त्यासाठीही पाणी अत्यंत फायदेशीर ठरतं.

डाएटसोबतच पाणी प्यायल्याने फायदा होतो. पाणी ऑक्सिजन आणि पोषक तत्व शरीराच्या इतर भागांमध्ये पोहोचवण्यासोबतच एनर्जी बूस्ट करतं. जर पाणी शुद्ध नसेल तर ते नुकसानदायी ठरू शकतं. काही ऑर्गॅनिक तत्व वजन वाढवू शकतात. पाणी किती प्यावं हे वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असतं. वजन, वातावरण आणि तुमचं काम यांवर ते अवलंबून असतं.

महिलांना दिवसभरामध्ये कमीतकमी ३ लीटर पाणी पिणं गरजेचं असतं. पुरूषांना ३ ते ५ लीटर पाणी पिणं आवश्यक असतं. यासाठी डॉक्टरांचा सल्लाही घेतला तर ते अधिक फायदेशिर ठरेल. शरीरामध्ये जमा फॅट्समध्ये कधी-कधी पाण्याचे प्रमाण अधिक असते. जर एकाच वेळी जास्त पाणी प्यायल्यास किडनी एकाच वेळी ते सर्व पाणी बाहेर टाकण्यासाठी सक्षम नसते. त्यामुळे एकाच वेळी खूप पाणी पिण्याऐवजी दिवसभर काही वेळाने पाणी प्यायले पाहिजे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु