तात्काळ वजन कमी करायचंय, ‘या’ पध्दतीचा अवलंब करा !

तात्काळ वजन कमी करायचंय, ‘या’ पध्दतीचा अवलंब करा !
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – वजन लवकर कमी करण्यासाठी ‘इंटर्व्हल ट्रेनिंग’ चांगला उपाय आहे. यात एक्झरसाइजमध्ये लवकर बदल केला जातो. ४५ ते ५० मिनिटांपर्यंत कार्डिओ करता येतो. यामध्ये वॉर्मअप आणि कूलडाऊन असावे.

इंटर्व्हल ट्रेनिंग असे करा

* अ‍ॅरोबिक्स, डान्स आणि स्टेप वर्कआउट यांसारखे ग्रुप एक्झरसाइजमध्ये इंटर्व्हल प्रिन्सिपल फॉलो करा.

* आठवड्यात दोन दिवस किक-बॉक्सिंग, स्विमिंग, स्पिनिंग, कार्डिओ करू शकता.

* वेट ट्रेनिंगमुळे मसल्स मजबूत होतील.

* मध्यंतरात खाल्ले तर चांगले परिणाम मिळतील. दिवसभरात तीन वेळा खाण्याऐवजी पाच ते सहा वेळा थोडे-थोडे जेवण घ्यावे. नट्स आणि सीड्स खाल्ले तर व्हिटॅमिन्स आणि मिनलरची कमतरता भासणार नाही.

* ट्रेड मिलवर वॉकिंग आणि जॉगिंग दोन्ही करावे. ग्रेड-५ वर चाला. सपाट पृष्ठभागावर जॉगिंग करू शकता. इनक्लाइन पोझिशनवर चालताना वेग कमी ठेवा. बागेत जाऊन इंटर्व्हल रनिंग प्रॅक्टिस करू शकता.

* क्रॉस ट्रेनिंगचे चांगले परिणाम दिसतात. प्रत्येक मशीनमध्ये वेगळी पॉश्चर गाइडलाइन असते. जास्तीत जास्त कॅलरी जाळण्यासाठी ते फॉलो करा. कणा ताठ ठेवा आणि जास्त कॅलरीज जाळण्यासाठी बाजू मागे-पुढे करा.

* सुरुवातीला लेव्हल-१ दोन मिनिटांपर्यंत करा. प्रत्येक दोन मिनिटांनंतर लेव्हल वाढवा आणि लेव्हल-५ पर्यंत जा. सरासरी आरपीएम ६० ते ६५ दरम्यान असावी. दहा मिनिटांपर्यंत असे केल्यानंतर लेव्हल-१ पर्यंत परत या. असे २ ते ३ मिनिटे करा.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु