डायबिटीज नियंत्रित करायचा आहे ? मग नक्की करा हे घरगुती उपाय

डायबिटीज नियंत्रित करायचा आहे ? मग नक्की करा हे घरगुती उपाय

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – वेळी-अवेळी खाणे, मानसिक ताणतणाव, आरोग्याकडे दुर्लक्ष यामुळे डायबिटीज होऊ शकतो. डायबिटीज होण्यामागे अनुवंशिक कारण असले तरी चुकीच्या जीवनशैलीमुळेही हा आजार होतो. हा आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी शरिराची काळजी घेतली पाहिजे. यासाठी डॉक्टरांकडे जाऊन नियमित तपासणी केली पाहिजे. डायबिटीजच्या रूग्णांची संख्या जगभरात वेगाने वाढत आहे. सर्व वयोगटातील लोकांना हा आजार होत असल्याने याचे गांभिर्य वाढत चालले आहे. देशात डायबिटीजचे ४.५ कोटीपेक्षा अधिक रूग्ण असल्याचे सांगितले जाते.

हे उपाय करा

* डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत. बेलाच्या आणि सिताफळाच्या पानाचे चूर्ण तयार करून प्रत्येक दिवशी डायबिटीजच्या रूग्णाने घेतल्यास डायबिटीज नियंत्रणात राहातो, असे म्हटले जाते.

* फणसाच्या पानाचा रस प्रत्येक दिवशी सेवन करावा. लिंबाच्या  कोवळ्या पानांचा रस सेवन केल्यांनतर डायबिटीज नियंत्रणात राहातो

* भोकर झाडाची १०० ग्रॅम पाने ३०० मिली पाण्यात उकळून त्याचा काढा  तयार करावा. हा काढा  प्यायल्यांनतर डायबिटीज नियंत्रणात येतो.

* व्यायाम तसेच योगा करणे लाभदायक ठरते.

* दोन ग्रॅम दालचीनी चूर्ण आणि एक लवंग पाण्यात उकळून घ्यावी. १५ मिनिटानंतर हे पाणी सेवन करावे. प्रत्येक दिवशी सकाळी आणि संध्याकाळी हा उपाय करावा.

* फरसबी आणि कोबीच्या रसाचे मिश्रण सेवन केले तर डायबिटीज नियंत्रणात राहतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु