वजन कमी करण्‍यासाठी सकाळी करा ‘ही’ ४ कामे, जीमला जाण्याची गरज नाही

वजन कमी करण्‍यासाठी सकाळी करा ‘ही’ ४ कामे, जीमला जाण्याची गरज नाही

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – वजन कमी करण्यासाठी जीमला जाणे, आहार कमी करणे, असे उपाय अनेकजण करत असतात. मात्र, त्याचा योग्य परिणाम लवकर दिसून येत नाही. यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसारच वजन कमी करण्याचा उपाय केला पाहिजे. परंतु, दिवसभरात काही खास कामे केल्यास, कठिण व्यायाम आणि अवघड डाएट प्लॅनचीही गरज भासणार नाही. ही चार कामे कोणती याविषयी जाणून घेवूयात.

ही कामे आवश्य करा
१.
सकाळी उपाशीपोटी १ ग्‍लास कोमट पाण्‍यामध्‍ये एका लिंबाचा रस आणि एक चमचा मध मिसळा. यामुळे शरीर डिटॉक्‍स होते. पच‍नक्रियाही सुधारते. वजनही कमी होते.

२. सकाळी दहा ते पंधरा मिनिटे किंवा संध्‍याकाळी कोवळ्या उन्‍हात बसावे. यामुळे शरीराला व्हिटॅमिन डी मिळते, फॅट सेल्‍स विरघळतात. चयापचय क्रिया सुधारते. तणाव दूर होतो. दिवसभर आनंदी राहता येते.

३. कॅलरी बर्न करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी रोज सकाळी किमान अर्धा तास चालण्याचा व्यायाम करावा. यामुळे सांधेदेखील मजबुत राहतात. शुगर आणि बीपी नियंत्रणात राहते. पचनक्रिया व्यवस्थित काम करते.

४. नाष्‍टा अवश्‍य करावा. यामुळे दिवसभर जास्त भूक लागत नाही.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु