सेक्शुअल परफॉर्मन्स वाढवण्यासाठी ‘हे’ व्यायाम प्रकार लाभदायक, अवश्य करून पहा

सेक्शुअल परफॉर्मन्स वाढवण्यासाठी ‘हे’ व्यायाम प्रकार लाभदायक, अवश्य करून पहा

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सेक्शुअल लाइफमुळे आरोग्य आणि फिटनेस लेव्हल चांगली राहते. शरीर फिट असेल तरच सेक्शुअल परफॉर्मन्स चांगला होऊ शकतो. यासाठी काही लाभदायक व्यायाम प्रकार असून ते खुप फायदेशीर ठरतात. हे व्यायाम कसे करावेत, त्यामुळे कोणकोणते लाभ होतात, याविषयी माहिती घेवूयात.

प्लँक
पुश-अप्सच्या स्थितित येऊन पाय आणि कंबर सरळ ठेवा. शरीर मधून बेंड करु नका. या स्थितीत जेवढा वेळ राहता येईल तेवढे राहावे. श्वास रोखून ठेवा.

कीगल
गुडघे वाकवून आरामाच्या स्थितीमध्ये बसा. लक्ष केंद्रित करुन पीसी मसल्स टाइट करुन संकुचित करा. पीसी मसल्स या पायांच्यामध्ये पेल्विक जवळ असतात. या काळात सामान्य स्वरुपात श्वास घेत राहा.

लंज
सरळ उभे राहा. यानंतर एक पाय उजव्या बाजूने समोर घ्या आणि गुडघ्यांवर जोर देऊन वाका. अन्य पायाने हिच प्रोसेस करा. हा व्यायाम तुम्हाला सेक्शुअली अ‍ॅक्टीव बनवण्यात मदत करतो.

स्केव्ट्स
सेक्शुअल परफॉर्मंस वाढवण्यासाठी स्केव्ट्स खूप लाभदायक आहे. हे आसन पॅल्विक एरियामध्ये ब्लड सर्कुलेशन वाढवते.

पुश अप्स
पोटावर सरळ झोपा. यानंतर शरीराचे पूर्ण वजन हात आणि पायांवर घ्या आणि शरीर वर उचला. शरीर खाली नेताना श्वास सोडा आणि शरीर वर उचलताना श्वास घ्या.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु