‘हे’ तर आश्चर्यच! केवळ खाण्यानेच नव्हे, पदार्थाच्या वासानेही वाढते वजन ; जाणून घ्या

‘हे’ तर आश्चर्यच! केवळ खाण्यानेच नव्हे, पदार्थाच्या वासानेही वाढते वजन ; जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन – सतत खाण्यामुळे वजन वाढते हे सर्वांनाच माहित आहे. परंतु, खाण्यासह पदार्थाचा वास सुद्धा वजन वाढण्यास कारणीभूत ठरू शकतो, असे अमेरिकेतल्या बर्कलेमधील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांना प्रयोगात आढळून आले आहे.

संशोधन म्हणतात…

* वजन वाढण्याच्या समस्येत पदार्थांचा वास महत्त्वाची भूमिका बजावतो.

* पदार्थांचा वास कॅलरीज बर्न करण्याच्या प्रक्रियेवर परिणाम करतो.

* संवेदनक्षमतेचा मोठा परिणाम चयापचय क्रियेवर होत असतो. त्यामुळे वजन वाढण्याचा संबंध केवळ कॅलरींशी लावणे चुकीचे आहे.

* खाण्याच्या आधी केवळ पदार्थाच्या वासानेच तोंडाला पाणी सुटते. खाण्याच्या आस्वादात पदार्थाच्या चवीसोबतच पदार्थाचा वास महत्त्वाची भूमिका बजावतो.

* वास येण्याच्या प्रक्रियेमुळे कॅलरीज शरीरात साठून राहतात त्या जळत नाहीत, यामुळेच वजन वाढते, असे संशोधकांना प्रयोगात आढळून आले.

* जर घाणेंद्रियांवर आणखी खोल काम केले तर मेंदू ऊर्जा कशी साठवतो, कशी वापरतो आणि तो शरीरात ऊर्जेचे संतुलन कसे राखतो याचे नीट आकलन होवू शकेल.

* या संशोधनाचा उपयोग वयोमानानुसार भूक मंदावण्याच्या समस्येत, किंवा अपघात किंवा पार्किन्सन सारख्या आजरात होवू शकतो.

 

Visit : Arogyanama.com 

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु