वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या

वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या

आरोग्यानामा ऑनलाइन टीम :  वजन कमी करण्यासाठी जपानी लोक डाएटकडे विशेष लक्ष देतात. स्लिम, फिट आणि सुंदर दिसण्यासाठी ते पारंपारिक पद्धतीचा वापर करतात. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी ते नियमित सोया मिल्कमध्ये मध मिसळून पितात. यामुळे फॅट लवकर बर्न होते आणि वजन वाढत नाही. त्यांच्या या डाएटविषयी आपण जाणून घेणार आहोत.

असे तयार करा सोया मिल्क
सोयाबीन रात्री पाण्यात भिजवून सकाळी ते थोडे मॅश करून घ्या. साल वेगळे झाले की, हे पाणी टाकून बारीक करा. नंतर गाळून घ्या. गाळलेले दूध उकळून घ्या. हे दूध कोमट करुन त्यात मध टाकून प्या. यातील फॅटचे प्रमाण कमी करण्यासाठी दोन वेळा हे दूध उकळून याची साय काढून घ्या. नंतर पाणी मिसळून गरम करा.

हे आहेत फायदे
१ यात फायबर असल्याने पचनसंस्था सुदृढ होते.
२ कोलेस्ट्रॉल कमी प्रमाणात असल्याने ह्रदयासंबंधी समस्या कमी होतात.
३ यातील आयसोफ्लेवोंसमुळे सांधेदुखी होत नाही.
४ यातील विटॅमिन बी१२ मुळे अशक्तपणा दूर होतो.
५ यामुळे फॅट बर्निंग प्रोसेस झाल्याने वजन कमी होते.
६ यातील विटॅमिन डी आणि कॅल्शियममुळे हाडे मजबूत होतात.
७ यातील लोहामुळे अ‍ॅनेमियापासून बचाव होतो.
८ प्रोटीन असल्याने मसल्स मजबूत होतात.
९ यातील अ‍ॅँटीऑक्सिडेंट्समुळे कॅन्सरपासून बचाव होतो.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु