‘या’ व्यायामाने कर्करोग रूग्णांच्या आयुष्यामानात होतो सकारात्मक बदल

‘या’ व्यायामाने कर्करोग रूग्णांच्या आयुष्यामानात होतो सकारात्मक बदल

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – नियमित चालण्यामुळे कर्करोगग्रस्त व्यक्तींच्या आयुष्यमानावर सकारात्मक बदल होऊ शकतो. तसेच या व्यक्तींच्या आयुष्यमान दर्जात सुधारणा होते. यासाठी आठवड्यात फक्त तीन दिवस तीस मिनिटे चालण्याची आवश्यकता असल्याचे, सरे विद्यापीठ आणि किंग्ज महाविद्यालय, लंडनच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनात दिसून आले आहे. हे संशोधन बीएमजे ओपन या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाले आहे.

असे केले संशोधन
*
४२ कर्करोग रुग्णांना दोन गटांत विभागले होते. पहिल्या गटातील रुग्णांना एक दिवसाआड तीस मिनिटांसाठी चालण्यास सांगण्यात आले. दुसऱ्या गटातील व्यक्तींना दररोजच्या जीवनात कोणताही बदल न करण्यास सांगितले.

* पहिल्या गटातील लोकांच्या शारीरिक, मानसिक व भावनिक आरोग्यात सुधारणा दिसून आली.

* नियमित चालल्यामुळे या आजाराविरुद्ध लढा देण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला. परंतु, कर्करोग जास्त बळावला असलेल्या रुग्णांमध्ये शारीरिक हालचालींचे प्रमाण अत्यंत कमी होते.

* नियमित व्यायामामुळे कर्करोग पुन्हा बळावण्यापासूनही थांबविले जाऊ शकते. इतर गंभीर आजारांवर नियंत्रण ठेवता येते.

* तीव्र आजारांनी ग्रासलेल्या लोकांना व्यायामास प्रवृत्त करावे, असे या संशोधकांनी म्हटले आहे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु