‘हे’ आहेत ८ चांगले-वाईट चरबीयुक्त पदार्थ, वजन राहील नियंत्रणात

‘हे’ आहेत ८ चांगले-वाईट चरबीयुक्त पदार्थ, वजन राहील नियंत्रणात

आरोग्यानामा ऑनलाईन टीम : वजन वाढण्याचा संबंध आहार, व्यायामाचा अभाव आणि आपल्या हार्मोन्स इम्बॅलन्सशी असतो. मांसल पेशी, चरबी, हाडे, पाणी व अवयव यावर शरीराचे वजन अवलंबून असते. वजनातील चढ-उतार हा प्रामुख्याने चरबी आणि पाणी यामुळे होत असतो. शरीरात चरबी वाढली की वजन वाढते. यासाठी आपण कोणते पदार्थ खातो यावर वजन वाढणे आवलंबून आहे. चांगले व वाईट असे दोन प्रकार चरबीयुक्त पदार्थांचे असून यातील चांगल्या पदार्थांचा सामवेश आपल्या आहारात केल्यास वजन नियंत्रणात राहू शकते. हे पदार्थ कोणते ते जाणून घेवूयात.

चांगले चरबीयुक्त पदार्थ
१ गायीचे तूप, लोणी, साय
२ नारळाचे तेल, शहाळे, खोबरे.
३ तेलबिया (तीळ, जवस, सूर्यफुलाच्या बिया, लाल भोपळ्याच्या बिया, शेंगदाणे अवाकॅडो, ऑलिव्ह)
४ काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता

वाईट चरबीयुक्त पदार्थ
१ वनस्पतीजन्य तूप.
२ अतितेलकट पदार्थ खाणे.
३ जुने पुनर्वापर केलेले तेल
४ घराबाहेर बनवलेले तळलेले पदार्थ

हे लक्षात ठेवा
१ शरीरातील चरबीचेही चांगले आणि वाईट असे दोन प्रकार आढळतात.
२ पोटाच्या आजूबाजूला साठलेली चरबी ही धोकादायक समजली जाते.
३ खांद्याच्या आणि कमरेच्या आवतीभोवती साठलेली चरबी ही कमी धोकादायक असते.
४ ब्राउन फॅट या प्रकारात मोडणारी चरबी शरीराला उपयोगी असते. ती ऊर्जेचा स्रोत असते.
५ कोलेस्टेरॉलही चांगले, वाईट अशा दोन प्रकारचे असतात. चांगले कोलेस्टेरॉल शरीराला हार्मोन्स बनवण्यासाठी, रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयोगी असतात. वाईट कोलेस्टेरॉल घातक असतात.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु