‘इनडोअर सायकलिंग’ चे हे 10 फायदे, व्यायाम आणि आरोग्यासाठी हा उत्तम पर्याय !

‘इनडोअर सायकलिंग’ चे हे 10 फायदे, व्यायाम आणि आरोग्यासाठी हा उत्तम पर्याय !

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – रनिंग, जॉगिंग, सकाळी फिरायला जाणे याचा फायदा शरीराला होतोच. मात्र, आपण कुठे आणि किती चालतो, कसे चालतो, कोणते शुज वापरतो, हेदेखील महत्वाचे असते. तसेच गुडघेदुखीचा त्रास असल्यास विशेष खबरदारी घ्यावी लागते. यासाठी सायकलिंग हा चांगला पर्याय आहे. गुडघेदुखी असलेलेही सायकलिंग करू शकतात. विशेष म्हणजे इनडोअर सायकल यासाठी अतिशय उपयुक्त आहे. ही सायकल तुम्ही विकत घेऊ शकता अथवा जिममध्ये जाऊन वापरू शकता.

हे आहेत फायदे

1) स्टॅमिना, एन्ड्युरन्स आणि ताकद वाढते.
2) मोठ्या प्रमाणात कॅलरीज बर्न होतात.
3) मसल्स स्टड्ढॉँग होतात.
4) गुडघेदुखी, नितंबाचा त्रास असणारे इनडोअर सायकलिंग करू शकतात.
5) शरीराची पॉवर वाढवून सडपातळ होऊ शकता.
6) कोअर मसल्स मजबूत होतात.
7) हृदयाची क्षमता वाढते.
8) वेट लॉस, ब्लड प्रेशर तसेच डायबेटिस कंट्रोलमध्ये राहाते.
9) रात्रीची झोप व्यवस्थित लागते.
10) टेन्शन कमी होते.

हे लक्षात ठेवा

1) कोणत्याही वयोगटातील कोणीही ही सायकल चालवू शकतात.
2) हळूहळू सुरुवात करून त्याचा वेळ आणि तीव्रताही वाढवू शकता.
3) उन्हाळा, हिवाळा, पावसाळा कोणत्याही ऋतुत हा व्यायाम करता येतो.
4) सर्वच वयोगटासाठी उपयुक्त.
5) डिजिटल असल्याने कॅलरी बर्नसह सर्व माहिती मिळू शकते.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु