जमीनीवर झोपण्याचे ‘हे’ आहेत ४ फायदे, गादीवर झोपणे तुम्ही सोडून द्याल

जमीनीवर झोपण्याचे ‘हे’ आहेत ४ फायदे, गादीवर झोपणे तुम्ही सोडून द्याल

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – जमीनीवर झोपणे आरोग्यासाठी चांगले असल्याचे तज्ज्ञ सांगतात. जमीनीवर अंथरूण टाकून झोपण्याबाबत काही धर्मातदेखील सांगण्यात आले आहे. बललेल्या जीवनशैलीमुळे बहुतांश लोक हे आरामदायी गादीवरच झोपतात. परंतू जमीनीवर झोपणे आरोग्यासाठी जास्त लाभदायक असल्याचे संशोधनातून समोर आले आहे.

हे आहेत फायदे

जमीनीवर झोपल्याने तणाव दूर होतो. मानसिक रोग कमी होतात.

बॉडीचे स्ट्रक्चर बिघडल्यामुळे विविध आरोग्य समस्या निर्माण होतात. चुकीच्या झोपण्याच्या सवयींमुळे हे आजार होतात. जमीनीवर झोपल्याने पुर्ण बॉडी समान असते.

खांदे आणि शरीराच्या खालच्या भागांचे संतुलन ठिक राहते. रक्तप्रवाह योग्य प्रकारे होतो. जास्त फ्रेश वाटते. कंबरदुखी, खांदेदुखी, रक्तवाहिन्यांमध्ये वेदना या समस्यांचा सामना करावा लागत नाही.

खांदेदुखीत आणि मानदुखी जमीनीवर झोपल्याने दूर होते.

जमीनीवर सरळ झोपल्याने कंबरदुखी दूर होते. जमीनीवर झोपल्याने मनक्याचे हाड सरळ होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु