उन्हाळ्यात फूड पॉइझनिंग टाळण्यासाठी करा ‘हे’ उपाय

उन्हाळ्यात फूड पॉइझनिंग टाळण्यासाठी करा ‘हे’ उपाय

आरोग्यनामा ऑनलाईन टीम- उन्हाळ्यात फूड पॉइझनिंग होण्याचा धोका सर्वात जास्त असतो. शिळे पदार्थ, बाहेरचा आहार यामुळे हा त्रास होतो. उन्हाळ्यात खाद्य पदार्थ लवकर खराब होतात. असे पदार्थ खाण्यात आले की, फूड पॉइझनिंग होते. यासाठी थोडी काळजी घेतली तर हा त्रास आपण सहज टाळू शकतो. घरगुती उपाय करून हा त्रास टाळता येऊ शकतो.

दही एका प्रकारे अँटीबायोटिक आहे. दह्यात थोडे काळे मीठ घालून खाल्ल्याने आराम मिळेतो. लसणातही अँटी फंगल गुण असल्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या १-२ पाकळ्या घेतल्याने आराम पडतो. लिंबात अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुण असल्याने लिंबू पाणी पिण्याने बॅक्टेरिया मरतात. रिकाम्यापोटी लिंबू पाणी प्यावे. गरम पाण्यात लिंबू पिळून प्यायल्यासही ते चांगले आहे. परंतु, पाणी स्वच्छ असणे खूपच महत्वाचे आहे.

तुळसदेखील फूड पॉइझनिंगचा त्रास टाळण्यासाठी उपयोगी ठरते. तुळशीत आढळणारे अँटीमिकोबियल गुणधर्म सूक्ष्मजीवांचा सामना करतात. तुळस अनेक प्रकारे आहारात घेता येऊ शकते. एका वाटीत दही घेऊन त्यामध्ये तुळशीचे पान, काळीमिरी आणि मीठ घालून सेवन करावे. तसेच चहात तुळशीचे पान टाकून चहा घेतला तरी फायदा होतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु