पिळदार शरीरयष्‍टी घडवण्यासाठी ‘हे’ उपाय करा

पिळदार शरीरयष्‍टी घडवण्यासाठी ‘हे’ उपाय करा

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पिळदार शरीरयष्‍टीसाठी अनेक तरूण जीमसह अनेक उपाय करत असतात. भारदस्त शरीरामुळे व्यक्तिमत्व प्रभावी होते. शरिरयष्‍टी बनविण्‍यासाठी तासनतास जिममध्‍ये व्‍यायाम करणारेही खूप आहेत. काही जण मसल्‍स वाढविण्‍याच्‍या गोळ्या, तसेच अंमली पदार्थ घेवून सुद्धा व्‍यायाम करतात. यामुळे शरीराचे कालांतराने नुकसान होऊ शकते. भारदस्त शरीरयष्‍टी बनविण्यासाठी काही महत्वाची माहिती आपण करून घेणार आहोत.

पिळदार शरीरयष्‍टीसाठी या टीप्स फॉलो करा

* यासाठी आहार अत्‍यंत महत्‍वाचा आहे. शरीराला प्रोटीनची जास्‍त आवश्‍यकता असते. प्रोटीन सोबत व्हिटायमीन, मिनरल आणि कार्बोहायड्रेट्स आवश्‍यक असतात. शरीरामध्‍ये याची मात्रा वाढविण्‍यासाठी फळ, डाळी, मासे, दूध, इ. पदार्थांचे तसेच संतुलित आहाराचे सेवन करावे.

* जास्तीत जास्त पाणी नियमित प्यावे. कारण पाण्‍यामुळे शरीरातील दुषित पदार्थ बाहेर टाकले जातात.

* व्‍यायाम करताना प्रथम वार्म अप करा. यामुळे बॉडी लव‍चिक होते वार्मअप केल्‍यानंतर योग्‍यरितीने व्‍यायाम करता येतो. थेट व्यायामाला कधीही सुरूवात करू नका.

* वार्मअपनंतर स्ट्रेचिंग करावे. यामुळे स्नायू व्‍यायामासाठी सक्रिय  होतात. स्ट्रेचिंग करताना स्‍नायू थोडे ताणावेत. स्‍नायूला ताण देताना घाई करु नये.

* मसल्‍स बनविण्‍यासाठी कार्डियो खूप उपयोगी आहे. सोप्‍या पध्‍दतीने हा व्‍यायाम करता येतो. पोहणे, सायकल चालवणे, धावणे इत्यादी व्‍यायाम करावेत.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु