‘स्मूदी’ घेऊन मधुमेह ठेवा दूर, अशी आहे कृती, जाणून घ्या मधुमेहाची ८ कारणे

‘स्मूदी’ घेऊन मधुमेह ठेवा दूर, अशी आहे कृती, जाणून घ्या मधुमेहाची ८ कारणे

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – टाईप २ मधुमेह हा संतुलित आहार, दैनंदिन व्यायाम, ध्यानधारणा आणि हिरव्या स्मूदीच्या सेवनानेही दूर ठेवता येतो. वाढलेली चरबी, आम्लता आणि पोषक द्रव्यांचा अभाव या तिन्हीवर स्मूदीने मात करता येते, असे काही तज्ज्ञ सांगतात. तसेच हृदयरोगामध्ये रक्तवाहिन्यात आम्लता व सूज वाढल्यानंतर चरबी जमा होऊन हृदयविकाराचा झटका येतो. यावर सुद्धा स्मूदी उपयुक्त आहे.

मधुमेहाची कारणे
१ चरबी वाढणे
२ सूज वाढणे
३ चहा, बिस्किट, मैद्याचे अतिसेवन
४ पोषक द्रव्यांचा अभाव
५ स्थगित लसिका
६ मानसिक ताण-तणाव
७ व्यायामाची कमतरता
८ चुकीची जीवनशैली

अशी तयार करा स्मूदी

– कोणतीही एक हिरवी पालेभाजी म्हणजे पालक (५ ते ६ पाने) किंवा आंबट चुका (१० ते १५ पाने) किंवा चाकवत किंवा राजगिरा/अंबाडी हे सर्व स्वच्छ धुऊन मिक्सरमध्ये टाका.
– त्यात पुदिन्याची २० ते २५ पाने व विड्याचे १ पान सुरुवातीला टाकावे. एका आठवड्यानंतर तुळस, कढीपत्ता, कोथिंबीर आलटून पालटून चवीनुसार टाकावे.
– एक फळ टाका. उपाशीपोटीची साखर ११० पेक्षा जास्त असेल तर सफरचंद किंवा पेर याचा वापर करा. जर उपाशीपोटीची साखर ११० पेक्षा कमी असेल तर किंवा मधुमेही नसाल तर केळ किंवा चिक्कू वापरावा.
– चिमूटभर दालचिनी व काळी मिरी, अर्धा चमचा सैंधव मीठ व अर्धा लिंबाचा रस घालावा.
– एक ग्लास पाणी टाकून मिक्सरमध्ये तीन मिनिटे फिरवावे.
– न गाळता ही हिरवी स्मूदी एकेक घोट सावकाश प्यावी.
– कमीतकमी १ ग्लास सकाळी उठल्यावर एक तासाच्या आत उपाशीपोटी घ्यावी. हे प्रमाण वाढवून नंतर २ ग्लास करा.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु