मसाल्याचे पदार्थ आरोग्यासाठी लाभदायक, होतात अनेक फायदे

मसाल्याचे पदार्थ आरोग्यासाठी लाभदायक, होतात अनेक फायदे

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – मसालेदार पदार्थ जास्त खाऊ नयेत, सल्ला नेहमीच तज्ज्ञांकडून दिला जातो. परंतु, हेच मसाले तर योग्य प्रमाणात सेवन केले तर त्याचा आरोग्यासाठी खूप चांगला फायदा होऊ शकतो. गरम मसाले विविध पदार्थांमध्ये चवीसाठी टाकले जातात. यामध्ये विविध मसाल्यांचा वापर केला जातो. रोजच्या जेवणातील पदार्थांमध्ये टाकले जाणारे हे मसाले, केवळ चवीसाठी म्हणून आपण टाकत असलो तरी त्यामागे आणखी हेतू असावा. कारण, हे मसाले आरोग्यासाठी अत्यंत लाभदायती असल्याचे सांगितले जाते.

जेवणात हिंग वापरणे पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी खूप आवश्यक आहे. यामुळे पोटात गॅस तयार होत नाही आणि अपचनही होत नाही. तसेच दालचिनीचा वापर केल्याने भाजीला चव येते. हा पदार्थ उष्ण असल्याने ब्लड शुगर आणि कॉलेस्टरोल नियंत्रित करणे तथा पचनक्रिया सुधारण्यास मदत मिळते. खाद्यपदार्थांचा गंध वाढवण्यात विलायची ठरते. तोंडाची दुर्गंधी दूर करणे, भूक वाढवणे, तणाव आणि मळमळणे यासारख्या समस्याही विलायचीमुळे दूर होतात.

लवंग चवीला तिखट असते. याची अँटिबॅक्टेरियल आणि अँटिसेप्टिक प्रॉपर्टी दातदुखीसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. तर मेथी ही चवीला कडू असली तरी मेथी रक्त शुद्धीकरणाचे काम करते. यामुळे त्वचेशी संबंधित आजार आणि मलावरोधातून सुटका होते. तसेच यामुळे मेटाबॉलिक रेटही तीव्र होतो. तसेच हळदीमधील अँटिसेप्टिक प्रॉपर्टी कोणतीही जखम किंवा घाव लवकर भरण्यास उपयोगी ठरते. तसेच उटण्यात हळदीचा वापर केल्यास त्वचेचा रंगही उजळतो. लाल मिरचीमुळे भाजीला चव येतेच, पण एलडीएल म्हणजेच वाईट कॉलेस्टेरॉलची पातळीही कमी होते. अशाप्रकारे मसाले आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी खूप महत्वाची भूमिका बजावतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु