नको असलेले केस दूर करण्याच्या काही सोप्या टिप्स

नको असलेले केस दूर करण्याच्या काही सोप्या टिप्स

आरोग्यनामा ऑनलाइन – शरीरावरील वाढलेले केस अनेकदा लाजीरवाने करतात. हे केस काढण्यासाठी शेविंग खुप त्रासदायक ठरते. घरीच काही सोपे उपाय नेहमी केल्याने नको असलेल्या केसांपासून सुटका मिळू शकते. पण यासाठी काही सावधगिरी बाळगणे आहे आवश्यक आहे. हे उपाय कायस्वरूपी नाहीत. शिवाय ते करण्याअगोदर एखाद्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. स्किनमध्ये इरिटेशन होत असल्यास हे उपाय करू नये. शिवाय उपाय केल्यनंतर मॉइश्चरायजर लावावे.

पहिला उपाय करण्यासाठी लिंबूच्या रसामध्ये साखर मिसळून लावा. २० मिनिटांनंतर हलक्या हाताने घासून गरम पाण्याने धुवून घ्या. तसेच दुसरा उपाय म्हणजे हळद पावडर, बेसन आणि मध मिसळून घट्ट पेस्ट बनवा ती बॉडीवर लावा. सुकल्यानंतर हलक्या हाताने घासून दूर करा. तिसरा उपाय आहे कच्च्या अंड्यांचा. यामध्ये कच्च्या अंड्यामध्ये कॉर्न फ्लोर आणि साखर मिसळून नको असलेल्या केसांना लावावे. सुकल्यानंतर हळुहळू केसांच्या विरुध्द दिशेने काढा. चौथा उपाय पपई वापरून करता येईल. कच्ची पपई आणि १ चमचा हळद पावडरची पेस्ट बनवून लावा. सुकल्यानंतर हलक्या हाताने मालिश करुन काढा.

पाचवा उपाय आहे दह्याचा. १ चमचा दही, १ चमचा साय आणि १ चमचा मोहरीची पेस्ट बनवून लावा. सुकल्यानंतर हळुहळू घासून काढा. सहावा उपाय करण्यासाठी नको असलेल्या केसांची जागा ओली करुन त्यावर ब्राउन शुगर घासावी. काही दिवसात केस कमी होतील. सातवा उपाय आहे डाळ आणि बटाट्याचा. भीजवलेली डाळ, कच्चे बटाटे, मध आणि लिंबूचा रस पेस्ट बनवून लावा. ३० मिनिटांनंतर घासून काढा. आठवा उपाय करण्यासाठी कोमट पाण्यात मीठ टाकून कॉटनच्या कापडाने बॉडी मसाज करा. काही दिवासांमध्ये केस कमी होणे सुरु होईल. नववा उपाय आहे कॉफीचा. कॉफीचे बीज आणि बेकिंग सोड्याची पेस्ट बनवून लावा. सुकल्यानंतर हलक्या हातांनी घासून काढा. वरील नऊपैकी कोणताही एक उपाय करून तुम्ही नको असलेले केस काढू शकता.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु