नपुंसकता आणि कमजोरी नष्ट करते ‘खारीक’

नपुंसकता आणि कमजोरी नष्ट करते ‘खारीक’

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – शरीराची ताकद वाढवण्यासाठी खारीक हे अतिशय उपयोगी आहे. यासाठीच आपल्याकडे कुस्तीपटू खारीक आणि दूधाचे सेवन करतात. यामुळे शरीर मजबूत होते. खारक हे खूप पौष्टिक असून पचनशक्ती चांगली असल्यास खारीक जास्त प्रमाणात खाणे फायदेशीर आहे. नेहमी बाजारात उपलब्ध असल्याने खारकेचे सेवन वर्षभर करता येते. विशिष्ट जातीचा खजूर वाळवून खारीक तयार केली जाते. खजूराला संस्कृत आणि हिंदीत खर्जुरी, मराठीत खारीक, तर इंग्रजीत डाय डेट म्हणतात.

शरीर ताकदवान बनावयचे असल्यास खारीकचे विविध उपाय करता येऊ शकतात. यासाठी बिया काढलेल्या चार खारका, एक चिमुटभर केशर आणि हवी असल्यास थोडी साखर ५०० मि.ली दुधामध्ये उकळून घ्यावी. रात्री झोपताना या दुधाचे सेवन केल्यास शरीराला उर्जा प्राप्त होते. आणखी एक उपाय म्हणजे खारकातील बिया काढून बारीक करून घ्या आणि २५० मिलीग्रॅम दुधामध्ये केळासोबत मिल्कशेक तयार करावा. याचे नियमित सेवन केल्यास वृद्धपणाशी संबंधित समस्या दूर होतात. खारीक पुरुषांमधील नपुंसकता दूर करण्याचा जालीम उपाय आहे. तीन महिने सलग खारीक खाल्ल्यास नपुंसकतेची समस्या दूर होते. दररोज रिकाम्या पोटी खारीक खावी. पहिल्या आठवड्यात एक खारीक आणि दुसऱ्या आठवड्यापासून पुढील दोन आठवडे दोन खारका दररोज चावून-चावून खाव्यात. तिसऱ्या आठवड्यात तीन खारका खाव्यात आणि चौथ्या आठवड्यापासून १२ व्या आठवड्यापर्यंत चार-चार खारकांचे दररोज सेवन करावे. नपुंसकतेची समस्या दूर होईल.

भूक वाढवण्यासाठी खारीक खूप उपयुक्त आहे. यासासाठी खारीक दुधामध्ये उकळून घ्यावी. थोड्या वेळाने थंड झाल्यानंतर बारीक करून घ्या. हे दुध खूप पौष्टिक असते, यामुळे भूक वाढते आणि अन्न व्यवस्थित पचते. तसेच सर्दीचा त्रास होत असल्यास खारीक उकळलेल्या दुधामध्ये विलायची पूड टाकून ते दूध प्यावे. सर्दी लवकर बरी होते. तसेच खारीक नियमित खाल्ल्यास दमा असणाऱ्या रुग्णांना आराम मिळू शकतो. अर्धांगवायू आणि हृदयविकाराचा त्रास खारकाच्या सेवनाने कमी होईल. खारीक नियमित खाल्ल्यास हृदयविकार होत नाहीत. शरीरातील रक्ताची कमतरता खारकाच्या सेवनाने दूर होईल. खारीक हाडांसाठी पोषक असते. पाठीचा कणा व सांधे यांची झीज होणे, अशक्तपणामुळे कंबर दुखणे, कमजोरी आदी त्रास होत असल्यास खारकेची पूड दुधासह घेणे गुणकारी आहे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु