नियमित व्यायाम केल्यास होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे

नियमित व्यायाम केल्यास होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – बदललेल्या जीवनशैलीमुळे कामाचे वेळापत्रक सतत बदलत असते. याचा परिणाम आहारासह सर्वच गोष्टींवर होतो. परिणामी अनेक व्याधींचा त्रास होण्याची शक्यता वाढते. हा त्रास टाळण्यासाठी नियमित व्यायाम करणे खूप गरजेचे आहे. आपल्या जीवनशैलीत थोडा बदल करून व्यायामासाठी वेळ काढल्यास अनेक आजारांना दूर ठेवता येणे सहज शक्य आहे.

व्यायामामुळे शरीरातील सर्व अवयवांना ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होतो. त्यामुळे शरीरात न्यूट्रिशन्सचा संचार वाढून फिटनेससाठी त्याचा उपयोग होतो. शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा वाढल्याने उत्साह वाढतो. तसेच व्यायाम केल्यास शरीरातील सेरोटॉनिन केमिकल सक्रिय होतात. जे मूड चांगला ठेवण्यासाठी महत्त्वाचे असतात.

तसेच यामुळे तणाव आणि बिनकामाच्या चिंतेतून मुक्ती मिळते. तसेच शारीरासह मनदेखील रिलॅक्स होते. व्यायाम केल्याने मानसिक स्थितीत चांगली सुधारणा होते. मेंदूतील रक्तसंचार वाढल्याने त्याची कार्यक्षमता जलद होते. परिणामी एकाग्रची क्षमता वाढून स्मरणशक्ती चांगली होते.

नियमित व्यायाम केल्याने शरीरातील एचडीएल म्हणजे चांगले कोलेस्टेरॉल वाढतात. तसेच ट्राएग्लेसराइडसारखे हानिकारक फॅट नियंत्रणात राहते. मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब आणि ऑर्थरायटिससारख्या समस्यांची शक्यता कमी होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु