पंतप्रधान मोदींनी सांगितले पवनमुक्तासनाचे फायदे

पंतप्रधान मोदींनी सांगितले पवनमुक्तासनाचे फायदे

पुणे: आरोग्यनामा ऑनलाईन : संपूर्ण भारतात २१ जून हा आंतरराष्ट्रीय योगदिवस म्हणून साजरा केला जातो. योगदिवस आता जवळ येऊन ठेपला आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी एक आसन करून त्याचा व्हिडीओ शेअर करतात. जेणेकरून लोकांना योग दिवसाचे महत्व कळावे. त्यांनी नुकताच त्यांच्या ट्विटरवर पवनमुक्तासनाचं व्हिडीओ शेयर केला. आणि त्याचे फायदेही सांगितले.

* पवनमुक्तासनाचे फायदे *

१) पोटाचे व पाठीचे स्नायू बळकट होतात.

२) हातांचे आणि पायांचे स्नायू पुष्ट होतात.

३) पोटातील आतडी व इतर अवयवांचे मर्दन होते.

४) पचनशक्ती सुधारते आणि पोटातील वायू बाहेर निघतो.

५) पार्श्वभागातील सांध्यांमध्ये रक्ताभिसरण वाढते व पाठीच्या खालच्या भागाचा ताण कमी होतो.

* पवनमुक्तासन कसे करावे *

पाठीवर झोपा. दोन्ही पाय जवळ ठेवा, दोन्ही हात शरीराजवळ ठेवा. एक श्वास घ्या. व तो सोडता सोडता उजवा गुडघा छातीपाशी घ्या. दोन्ही हाताचे पंजे एकमेकांत गुंतवून गुडघा पोटावर दाबा. पुन्हा एकदा एक श्वास घ्या व तो सोडता सोडता डोके आणि छाती जमिनीपासून वर उचला व तुमच्या हनुवटीचा उजव्या गुडघ्याला स्पर्श करा. याच स्थितीत काही दीर्घ श्वास घ्या. लक्षात ठेवा. प्रत्येक बाहेर जाणाऱ्या श्वासाबरोबर गुडघा दोन्ही हातांनी आणखी दाबा. छातीवरील दाब वाढवा. जसा श्वास सोडाल तशी पकड ढिली करा. श्वास सोडता सोडता शरीर जमिनीला टेकवा व आराम करा. ह्याच पद्धतीने डाव्या पायाने आसन करा व नंतर दोन्ही पाय घेऊन करा. ह्या आसनस्थितीत वर-खाली व दोन्ही बाजूंना शरीराला ३-५ वेळा झोके द्या व आराम करा.परंतु ज्यांना कंबरदुखीचा त्रास आहे. त्यांनी हे आसन करू नये. करायच असेल तर एखाद्या योगाशिक्षाकडून प्रशिक्षण घ्यावे. आणि मगच हे आसन करावे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु