लठ्ठपणा आणि किरकोळ शरीरामुळेही येते नैराश्य ! लक्षात ठेवा ‘या’ 5 गोष्टी

लठ्ठपणा आणि किरकोळ शरीरामुळेही येते नैराश्य ! लक्षात ठेवा ‘या’ 5 गोष्टी

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – लठ्ठपणा आणि किरकोळ देहयष्टीचा शरीरावर जवळपास सारखाच वाईट परिणाम होत असतो. या दोन्हीमुळे अनेक आजार शरीराला जडतात. अशक्तपणा आयुष्यावर, लाइफस्टाइलवर आणि क्षमतेवरही परिणाम करीत असतो. त्यामुळे काहींना वजन वाढवण्याचा सल्ला डॉक्टर अनेकदा देतात. तर अनेकांना बारीक होण्याच्या मानसिकतेन पछाडलेले असते. पण जास्त जाड आणि जास्त बारिक असणे हे दोन्ही शरीरासाठी घातक असून त्यामुळे नैराश्य येऊ शकते, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

हे लक्षात ठेवा

१. तुम्ही लठ्ठ असाल किंवा अशक्त असाल तर तुम्हाला नैराश्य येऊ शकते.

२. ज्या महिला लठ्ठ किंवा अशक्त असतात, त्यांना नैराश्याच्या समस्येचा जास्त तीव्रतेने सामना करावा लागतो.

३. यासाठी कोणीही या दोन्ही टोकाच्या गोष्टीपासून दूर रहावे.

४. काही जण अगोदर तंदुरुस्त असतात, पण बारीक होण्याच्या हव्यासापायी आणि त्यासाठी स्वत:वर केलेल्या निरनिराळ्या प्रयोगांमुळे त्यांना आजार जडतात. अशा लोकांना अशक्तपणा येतो आणि अर्थातच त्यानंतर विविध विकार होतात.

५. लठ्ठपणा आणि अति किरकोळ शरीर अशा दोन्ही प्रकारांपासून स्वत:ला वाचवा.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु