पुरुषांनी शुक्राणू वाढीसाठी करावेत ‘हे’ रामबाण उपाय

पुरुषांनी शुक्राणू वाढीसाठी करावेत ‘हे’ रामबाण उपाय

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पुरूषामध्ये शुक्राणू जास्त अथवा कमी प्रमाणात असणे हे धडधाकटपणा किंवा किरकोळ प्रकृती यावर ठरत नसते. त्यास विविध घटक कारणीभूत असतात. एखाद्या पुरुषाचे शरीर धडधाकट असले तरी त्याच्यात शुक्राणूंची कमतरता असू शकते. तर एखाद्या किरकोळ देयष्टीच्या पुरूषामध्ये जास्त प्रमाणात शुक्राणू असू शकतात. आपल्या जीवनशैलीवर देखील हे प्रमाण अवलंबून आहे. सतत कामाचा तणाव, धावपळ यांचा आपल्या मनावर विपरित परिणाम होत असतो. रात्री झोपताना थकवा, कमजोरी जाणवणे यांचा परिणाम पुरुषत्वावर होतो. मात्र, संशोधकांनी केलेल्या एका संशोधनातून असे समोर आले आहे की, नियमित कामक्रीडा म्हणजेच सेक्स केल्यास शुक्राणू मजबूत होतात.

शास्त्रज्ञांना असे आढळून आले की, आठवडाभरात नियमित सेक्स केल्यानंतर शुक्राणूच्या नमुन्यात डीएनएचे कमी नुकसान झाल्याचे आढळून आले आहे. त्याप्रमाणे वीर्यस्खलन झाल्याने देखील शुक्राणूचा दर्जा सुधारल्याचे दिसून आले. वीर्यवृद्धीसाठी तुळस गुणकारी आहे. तुळस हे कामलोलुपताचे औषध असल्याचे आयुर्वेदात म्हटले आहे. तुळशीची पाने खाल्याने हार्मोन्स सक्रीय होतात. तसेच लसूणदेखील यावर गुणकारी आहे. लसणात कामोत्तेजक गुण असतात, हे अभ्यासात सिद्ध झाले आहे. दररोज रात्री झोपताना लसणीचे दोन पाकोळ्या खाऊन एक ग्लास पाणी प्यावे. यामुळे वीर्यवृद्धी होते. लसणाचे सेवनाने रक्ताभिसरण आणि यौन क्षमता वाढण्यास मदत होते.

याशिवाय वीर्यवृद्धीसाठी आवळादेखील उपयोगी आहे. आवळा हा वीर्यवृद्धीवर अतिशय गुणकारी मानला जातो. आवळा चुर्ण पाण्यात घालावे. सकाळी हे पाणी गाळून त्यात हळद मिसळून प्यावे. यामुळे पौरुषत्व वाढते आणि वीर्य अधिक तेजस्वी होते. याशिवाय किशोरवयीन मुलांना स्वप्नदोषांच्या समस्या असतील, तर त्यांना आवळा मुरब्बा खायला द्यावा. कामेच्छा उत्तेजित करण्यासाठी मसाल्यांमधील इलायची अथवा वेल्चीचा वापर केला जातो. वेल्ची घालून चहा पिणेदेखील वीर्यवृद्धीसाठी चांगले असते. तसेच आलं सेवनामुळे सेक्स दरम्यान उत्तेजना वाढण्यास मदत होते. रात्रीच्या जेवणानंतर आल्याचा चहा पिणे वीर्यवृद्धीसाठी चांगले ठरते. दररोज एक केळी खाऊन दूध प्यायल्यास वीर्यवृद्धी होते. केळी हे वीर्यवृद्धीसाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. मिरचीमुळे एंडोरफीन रिलीज होतात आणि त्यामुळे अस्वस्थता दूर होते. रक्तप्रवाह नियंत्रणात राहातो. मूड बनविण्याचे काम मिरची करते. तसेच स्टॉबेरी सेक्सी मूड बनवण्यासाठी उत्तम फूड आहे. यातील व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सीडेंट पुरुषांमध्ये शुक्राणूंची वृद्धी करण्यात सहायक ठरतात. डार्क चॉकलेटसोबत स्टॉबेरी तुमच्या कामेच्छेमध्ये वृद्धी करून तुमचा मूड बनवू शकते.

केशर महिलांमधील कामेच्छा वाढवण्यात प्रभावी ठरते. केशर गरम पाण्यामध्ये १५ मिनिट भिजवून ठेवा आणि त्यानंतर हे तांदळासोबत खावे. या उपायाने महिलांमधील कामेच्छा वाढेल. डाळिंबाचे फळ आहारात घेतल्याने किंवा डाळिंबाचे ज्यूस नियमित सेवन केल्याने सेक्स पॉवर दुपटीने वाढते, असे एका अभ्यासात स्पष्ट झाले आहे. डाळिंबाच्या ज्यूसमुळे सेक्स जागृत करणारा हॉमोन्स टेस्टास्टेरॉन उत्तेजीत होऊन तो अधिक कार्यशील होत असतो. एवढेच नव्हेत व्यक्तिची स्मरणशक्ती वाढते व त्याचा मूडही चांगला राहतो. बदामामध्ये झिंक, सेलेनियम आणि व्हिटॅमिन ई सोबतच सेक्शुअल हेल्थ आणि उत्तम सेक्स लाइफसाठी आवश्यक असलेले इतर पोषक तत्व असतात. जे कामेच्छा वाढवण्यासोबतच आरोग्यामध्येसुद्धा वृद्धी करतात.

व्यतिरिक्त बदाम तुमच्या त्या अंगांमध्ये रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्याचे काम करतो. चवीसाठी रताळे जेवढे चांगले असतात तेवढेच तुमच्या सेक्स लाइफसाठीसुद्धा उत्तम ठरतात. पोटॅशियम, बीटा कॅरोटीन यासारखे तत्व तुम्हाला ब्लडप्रेशर आणि हृदयाच्या समस्यांपासून दूर ठेवून कामेच्छा आणि सेक्स लाइफमध्ये वृद्धी करतात. तिळामध्ये उपस्थित झिंक सेक्स लाइफसाठी उत्तम पोषक तत्व आहे. यासोबतच हे टेस्टोस्टेरॉनला उत्प्रेरीत करून पुरुषांमध्ये शुक्राणूची वृद्धी करण्यास मदत करतात. तर मग उत्तम सेक्स लाइफ आणि कामेच्छा वृद्धीसाठी नियमित तिळाचे सेवन हा एक चांगला उपाय आहे. व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी६, पोटॅशियम आणि अँटीऑक्सीडेंटने भरपूर हे फळ तुमच्या हृदयाचे रक्षण तसेच सुरळीत रक्तप्रवाहसोबतच सेक्स लाइफलासुद्धा उत्तम बनवते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु