शरीराच्या ‘या’ भागांच्या मसाजने मिळतील ‘हे’ फायदे, अनेक समस्या होतील दूर

शरीराच्या ‘या’ भागांच्या मसाजने मिळतील ‘हे’ फायदे, अनेक समस्या होतील दूर

आरोग्यनामाऑनलाइन टीम – डोकेदुखी, थकवा, कंबरदुखी अशा छोट्या छोट्या दुखण्यांवर लगेच औषध घेण्याऐवजी घरगुती उपाय, एक्यूप्रेशर टेक्नीक आणि मसाजची मदत घ्यावी. मसाज केल्याने वेदना दूर होतात. सतेच सर्व चिंता दूर होतात. शरीराच्या कोणत्या अंगाला मसाज केल्याने कोणत्या समस्या दूर होतात, याविषयी जाणून घेवूयात.

या ठिकाणी करा मसाज

नाक आणि ओठांच्या मधल्या भागात मसाज केल्याने स्मरणशक्ती वाढते. अंगदुखीपासून आराम मिळतो.

कान टोचलेल्या भागाची मसाज केल्याने डोकेदुखी थांबते. मेटाबॉलिजम जलद होते.

अंगठा आणि इंडेक्स फिंगरच्या मधल्या भागात मसाज केल्याने कान, पाठ आणि मानेच्या वेदना थांबतात.

पायाचा अंगठा आणि त्याच्या बाजूच्या बोटाच्या मध्ये मसाज केल्यास स्मरणशक्ती तल्लख होते. डोकेदुखी थांबते.

गुडघ्यांच्या मागच्या बाजूला थोडे खाली मसाज केल्याने पचनक्रिया दुरूस्त होते. सूज कमी होते. वजन वाढत नाही.

खांद्यांची मालिश केल्याने पाठदुखी थांबते. पेशी मोकळ्या होतात.

मानेची मसाज केल्याने झोप चांगली येते. थकवा, डोकेदुखी दूर होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु