तंदुरुस्त राहण्यासाठी वेळापत्रकात करा थोडासा बदल

तंदुरुस्त राहण्यासाठी वेळापत्रकात करा थोडासा बदल

आरोग्यानामा ऑनलाइन टीम – तंदुरुस्त राहण्यासाठी केवळ जीममध्ये जाणेच हा पर्याय नसून यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. जर तंदुरूस्त जीवन हवे असेल तर वेळापत्रकात थोडासा बदल केला तरी ते शक्य आहे. नियमित जिममध्ये जाणे शक्य नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी फक्त तुमच्या वेळापत्रकात बदल करावा लागेल. यासाठी तज्ज्ञांनी काही सोप्या पद्धती सांगितल्या असून त्याचे पालन केले तर शरीर निरोगी राहील.

यासाठी दुपारचे भोजन केल्यानंतर लगेचच कामाला लागू नये. किमान दहा मिनिटे तरी जेवणानंतर थोडे चालणे शरीरासाठी आवश्यक आहे. चालताना मित्रासोबत फोनवरून बोलता येईल किंवा एक कप कॉफीचे सेवन करता येईल. याशिवाय कार्यालयीन सहर्कायांशी गप्पाही मारता येतील. दिवसभर काम करत असताना शरीराला आवश्यक प्रथिनांची कमतरता भासते. सायंकाळच्या वेळी शरीराला प्रथिनांची गरज भासते. या वेळी प्रोटीन शेक घ्यावा किंवा सफरचंद खावे. त्यामुळे पुन्हा काम करण्यासाठी भरपूर ऊर्जा मिळते. प्रथिने न खाल्ल्यास शरीर निरोगी राहत नाही.

शरीराला पुरेशा प्रमाणात पाणी न मिळणे, हे देखील खूप गरजेचे असते. डिहायड्रेशनपासून बचाव करण्यासाठी दर ४० मिनिटांनी पाणी प्यायला पहिजे. दिवसभरात किमान १० ते १२ ग्लास पाणी पिणे हे शरीरासाठी आवश्यक आहे. तसेच सकाळी उठल्यानंतर काही मिनिटांनी संपूर्ण शरीराची स्ट्रेचिंग आणि फ्रीवेट व्यायाम करावा. १५ ते २० मिनिटे हा करावा. एका सत्रात २० अँब्ज क्रंचेस, २० पुश-अप्स आणि २० स्क्वॅट्स करावे. एकावेळी तीन सेट्स करून विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा सुरू करावे. क्षमतेनुसारच सेट्स करावेत.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु