ज्येष्ठांना आहारात काय द्याव आणि काय नको ?, जाणून घ्या

ज्येष्ठांना आहारात काय द्याव आणि काय नको ?, जाणून घ्या

कसा असावा ज्येष्ठांचा आहार?

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – जसजसे वय वाढतं तसतसे अनेक आजार आपल्या शरीरात घर करतात. ‘वृद्धांसाठी आरोग्यशास्त्र’ ही आता एक स्वतंत्र शाखा झाली आहे ज्याला ‘Geriatrics’ असे म्हणतात.

सर्व साधारणपणे वृद्धांच्या आरोग्य समस्यांची यादी अशी करता येईल:

१) दात पडणे व खाता न येणे->अपचन->कुपोषण
२) कमी दिसणे व कमी ऐकू येणे
३) स्मृतीभ्रंश (अल्झायमर्स)
४) सांधेदुखी—विशेषत: गुडघे
५) मधुमेह
६) उच्च रक्तदाब
७) अती रक्तदाबामुळे रक्त वाहिन्या जाड होऊन  ह्रदयरोग होणे
८) लकवा,अर्धांगवायू,पक्षाघात
९) पुरुषांमध्ये प्रोस्टेटची वाढ होऊन लघवीचा त्रास होणे
१०) स्त्रियांमध्ये हार्मोन्सच्या कमतरतेमुळे होणारे मानसिक व शारिरीक त्रास

वय कोणतंही असलं तरी सगळ्यांनीच पोषक आहार घ्यायला हवा. पण ज्येष्ठांनी जर आहाराच्या बाबतीत काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर म्हातारपण अधिक सुसह्य होऊ शकतं.

१.कॅलरीज़ : जसजसे वय वाढतं तसतसे आपला BMR (Basal Metabolic Rate) कमी होतो व त्यामुळे कॅलरीज़ पण कमी लागतात. एखाद्या 55 वर्षाच्या व्यक्तीला जर 1700 कॅलरीज़ रोज लागत असतील तर 70 व्या वर्षी त्याच व्यक्तीला 1400 कॅलरीज पुरेशा  असतात.

२.प्रथिने : प्रोटीन्स आहारात खूप महत्वाची भूमिका बजावत असतात.शरीराला झालेली ज़खम व झीज किंवा जून्या पेशी पूर्ववत करण्यासाठी प्रोटीन्सचा उपयोग होतो.डाळी,कडधान्य,हिरवे मटर,सोयाबीन,दूध व दूग्धजन्य पदार्थ,अंडी,चिकन ब्रेस्ट या गोष्टींचा समावेश हवा.

३.कॅलशियम : हाडांचा ठिसूळपणा व सांधेदुखी कमी करण्यासाठी/टाळण्यासाठी दूध पिणं हा चांगला पर्याय आहे. दूध आवडत नसेल तर ताक,दही,लस्सी,चीज़ किंवा पनीर हे पदार्थ आहेतच!

४.व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स:
ताजी फळं व हिरव्या पालेभाज्यांचं सेवन फायदेशीर आहे. पपई आणि गाजर नेत्रं दृष्टी साठी उत्तम आहे.

५.फायबर्स:वयोमानानुसार आतड्यांची 
हालचाल मंदावल्यामुळे बद्धकोष्टाचा त्रास होऊ शकतो.पोट साफ होण्याकरिता तंतूमय पदार्थांचा समावेश करावा.दात नाही म्हणून अनेक जण फक्त भात खातात पण त्यातून फायबर्स मिळत नाही. अशावेळी पोळी/ ज्वारी-बाजरीची भाकरी वरणात/सारात/आमटीत बुडवून/चुरुन खाता येईल.

६.न्याहरी:
सकाळचा नाश्ता आहारातूला खूप महत्वाचा भाग आहे. रव्याचा शिरा,उपमा,इडली/डोसा-सांबार,ढोकळा,मिक्स पीठांची आंबोळी असे अनेक पदार्थ खायला हरकत नाही.

शेवटी योग्य संतुलित आहार व विहार हाच एक आरोग्यदायी जीवन जगण्याचा मंत्र ज्येष्ठांनी स्वीकारावा ही सदिच्छा!

 

Dr.GayatriSameer Bodas
B.H.M.S., Certified Nutritionist
Dnyanada Clinic
Shop No.8,Kumar Pushkar
840 Sadashiv Peth , Pune30
Mobile:8983781407
[email protected]

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु